पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये विधानभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यावर त्यानुसार राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. स्वबळ, युत्या, आघाड्या, जागावापटप, सत्तावाटपाचा फॉर्म्युला आदी गोष्टींना गती आली आहे. अशात तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 (Tamil Nadu Assembly Election 2021) साठी द्रविड़ मुनेत्र कड़गम (DMK) आणि काँग्रेस (Congress) पक्षांनीही ही निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षांमध्ये जागवाटपाची बोलणी झाली असून कोण किती जागा लढवणार, याचेही सूत्र ठरले आहे.
विधानसभा निवडणुकीत द्रविड़ मुनेत्र कड़गम (DMK) पक्षाने काँग्रेसला एकूण 25 जागा दिल्या आहेत.यात कन्याकुमारी येथील लोकसभेच्या जागेचाही समावेश आहे. 7 मार्चच्या सकाळी 10 वाजता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या जागावाटपावर स्वाक्षऱ्या केल्या.
चेन्नईमध्ये तामिळनाडू काँग्रेस पक्षाचे प्रमुख के एस अलगिरी यांनी म्हटले की, आमची DMK पक्षासोबत जागावाटपाची बोलणी झाली आहेत. ही बोलणी दोन्ही पक्षांना मान्य आहेत. त्यानसार काँग्रेस पक्ष 25 जागा लढवणार आहे. तसेच, कन्याकूमारी लोकसभा मतदारसंघातही काँग्रेस पोटनिवडणूक लढवणार आहे. (हेही वाचा, West Bengal Assembly Election 2021: अभिनेता Mithun Chakraborty पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर दिसण्याची शक्यता)
या वेळी काँग्रेस पक्षाला केवळ 25 जागा देण्यामागे पाठिमागच्या वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा दाखला देण्यात येत आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मागच्या वेळी 41 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी या पक्षाला केवळ 8 जागा जिंकता आल्या. त्यामुळे DMK हा पक्ष बहुमतापासून प्रचंड दूर गेला.या वेळी ही चुक करणे DMK ने टाळले काँग्रेसला अवघ्या 25 जागा दिल्या.
दरम्यान, गेल्या प्रदीर्घ काळापासू डीएमके आणि काँग्रेस या पक्षांमध्ये जगावाटपाच्या मुद्यावरुन जोरदार संघर्ष सुरु होता. कोणत्याही स्थितीमध्ये काँग्रेस 30 पेक्षा कमी जागा लढविण्यास राजी नव्हते. परंतू, तामिळनाडूमध्ये गेल्या वर्षांमध्ये झालेली काँग्रेसची स्थिती फार दयनीय झाली आहे. त्यामुळे काँग्रेस ही फारशा तडजोडी आणि सौदेबाजी करण्याच्या स्थितीत दिसत नाही.
दुसऱ्या बाजूला AIADMK पक्षासोबत भाजप युती करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या जागावाटपात AIADMK पक्षाकडून भाजपला केवळ 20 जागा मिळण्याची चिन्हे आहेत. तसेच, कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघातूनही भाजप आपला उमेदवार उतरवणार आहे.