ताज महाल (फोटो सौजन्य- Pixabay)

Agra: प्रेमाचे प्रतीक आणि अतिरम्य कलाकुरीचे काम असणाऱ्या ताज महालाचे (Taj Mahal) दर्शन घेण्यासाठी पर्यटकांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच तिकीटांच्या दरात पाचपटींनी वाढ करण्यात आली आहे.

जगातील सात आश्चर्यांमधील एक अशी ताजमहालाची गणना केली जाते. तसेच ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी शुल्क आकारणीसुद्धा केली जात. त्यामुळे पर्यटकांना आता 50 रुपयांच्या तिकीटावर 250 रुपये शुल्क आकारला जाणार आहे. तर परदेशी पर्यटकांसाठी 1300 रुपये आणि सार्क देशातील पर्यटकांना 540 रुपयांऐवजी 740 रुपये जादा द्यावे लागणार आहेत.

मात्र ज्या पर्यटकांनी 50 रुपयांचे तिकीट खरेदी केले आहे त्यांच्यासाठी, मुख्य कबरीच्या येथे प्रवेश करण्यास मनाई आहे. तर ताजमहालाच्या आजूबाजूच्या परिसर आणि यमूना नदीचे दर्शन घेता येणार आहे.