
Agra Accident: आग्रा येथील कागरोळ भागातील सैया परिसरात झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी घडलेल्या या अपघातात हे चौघे एकाच मोटारसायकलवरून एका लग्न समारंभासाठी जात होते. रात्री दहाच्या सुमारास चौघेही परतत असताना कागरोळ परिसरात त्यांच्या मोटारसायकलला समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलची जोरदार धडक बसली आणि हा भीषण अपघात घडला आहे. भगवान दास (35), वकील (35), राम स्वरूप (28) आणि सोनू (30) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली तसेच दुसऱ्या मोटारसायकलवरून जाणाऱ्या करण या 17 वर्षीय युवकाचाही मृत्यू झाला असून करणसोबत असलेल्या किशनवीर नावाचा आणखी एक जण जखमी झाला.
किशनवीरवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.