Khushi Shah (Photo Credits- ANI)

गुजरातमधून (Gujarat) एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. 12 वर्षांच्या एका मुलीने चक्क संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. खुशी शहा (Khushi Shah) असे या मुलीचे नाव आहे. खुशी आता अगदी सामान्य जीवन जगणार असून सुरत मध्ये ती आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत जैन धर्माची दीक्षा घेणार आहे. आज आयोजित कार्यक्रमात खुशी शहा दीक्षा घेणार आहे. खुशीने 7 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

ANI ट्विट:

या मार्गावर जाणारी खुशी ही पहिलीच मुलगी नसून त्यांच्या कुटुंबातील यापूर्वी 4 लोकांनी दीक्षा घेतली आहे. आपल्या निर्णयाबद्दल एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना खुशीने सांगितले की, "या जगात आनंद थोड्या वेळासाठी आहे आणि तो शाश्वत नसतो. मी 12 वर्षांची आहे आणि मी दीक्षा घेऊ इच्छित आहे."

यापूर्वी देखील अनेक तरुणांनी संपत्ती, ऐश्वर्याचा त्याग करत जैन भिक्षुक बनवण्यासाठी दीक्षा घेतील आहे. गेल्या वर्षी 12 वर्षीय गुजराती मुलाने जैन भिक्षुक बनण्यासाठी कुटुंबाचा त्याग केला होता. तसंच हिरे व्यापारी भव्य शहा याने 500 हून अधिक भिक्षुक आणि 7,000 लोकांच्या उपस्थितीत दीक्षा घेतली.

दीक्षा घेतल्यानंतर सर्व सांसारिक सुखांचा आणि ऐश्वर्याचा त्याग करतात. सफेद कपडे घालून पायी लांबचा प्रवास करतात. भिक्षा म्हणून जे मिळते, तेच ग्रहण करतात. दीक्षा घेतलेले लोक मानसिक शांतीवर लक्ष केंद्रीत करतात त्यासाठी ते ध्यानाचा पर्याय निवडतात.