Mahavir Jayanti 2019 (Photo Credits- File Photo)

जैन संप्रदायींचा महत्वाचा सण म्हणजेच महावीर स्वामींचा जन्मदिवस आज देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. जैन धर्मातील 24वे तीर्थांकर वर्धमान महावीर यांनी समाजाला अहिंसा व शांततेचे धडे दिले आहेत. श्रीमंत घरात जन्म घेऊनही वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. क्षमेचे महत्व पटवून देणाऱ्या महावीर स्वामींनी दीक्षा घेतल्यावर तब्बल 12 वर्षांची साधना केली होती.

लाखो शत्रूंच्या विरोधात जिंकण्यापेक्षा स्वतःच्या वागणुकीत जिंकण्याला महत्व देणाऱ्या वर्धमान महावीर स्वामींच्या आज 17 एप्रिलला साजऱ्या होणाऱ्या जयंतीच्या निम्मिताने त्यांच्या मूलभूत तत्व व शिकवणीं विषयी जाणून घेऊयात.. Mahavir Jayanti 2019: महावीर जयंती का साजरी केली जाते?

कर्म आणि आत्म्यावर विश्वास

माणसांच्या दुःखाचे मुख्य कारण म्हणजे त्यांची स्वतःची वागणूक असते.स्वकर्तृत्वाच्या चुकांवर नियंत्रण ठेवल्यास सुखप्राप्तीत गती लाभते असेही महावीर सांगतात. भौतिक सुखाच्या मागे न धावता आत्म्याच्या समाधानासाठी माणसांनी प्रयत्न करायला हवेत.

निर्वाणा

मनशांती व मोक्ष हे परमोच्च सुख मानणाऱ्या महावीरांनी समाजाला मोक्ष प्राप्तीसाठी मार्ग देखील तयार केला आहे. अहिंसा (हिंसा करू नये), सत्य (खरे बोलावे), अस्तेय (चोरी करू नये), ब्रम्हचर्य (मोह बाळगू नये), व अपरिग्रह (भौतिक सुखाच्या आहारी जाऊ नये) ह्या पाच मुख्य वचनांसोबतच योग्य विचार, योग्य विश्वास, योग्य ज्ञान या तीन तत्वांचे पालन केल्यास मोक्ष प्राप्तीचा मार्ग अधिक सुकर होत असल्याचे सांगितले जाते.

मूर्तिपूजा व वेदांना नकार

जैन धर्मा नुसार महावीरांनी देव या संकल्पनेला नाकारून कर्म म्हणजे मानवी कृतीला अधिक महत्व दिले आहे. त्यानुसार मूर्तिपूजा व वेदांमधील विधींना नाकारलेले दिसून येते.

स्त्री स्वातंत्र्य

वर्धमान महावीरांनी स्त्री स्वातंत्र्याला प्रोत्साहित करणारे विचार  नेहमीच मांडले  होते. स्त्रीलाही मोक्ष प्राप्तीचा पूर्ण अधिकार आहे असे त्यांचे ठाम मत होते. परिणामी आजही जैन धर्मीयांमध्ये सर्मीनी किंवा  सर्विकास जीवन  स्वीकारताना पाहायला मिळतात.

वर्धमान महावीर यांनी  समाजात आपल्या विचारांच्या प्रसारासाठी आयुष्य वेचले पण कोणताही नवा धर्म लोकांच्या माथी येऊन थोपण्यापेक्षा त्यांनी पूर्वापार चालत आलेल्या रूढींमध्ये सोयीस्कर व प्रगतशील बदल करण्याला पसंती दर्शवली.