बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या मृत्यूनंतर मानसिक आजार या विषयावर जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना केंद्र आणि विमा नियामक मंडळ एवं विकास प्राधिकरण (IRDA) ला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नोटीस पाठवली आहे. न्यायालयासमोर सुनावणी झालेल्या याचिकेत म्हटले आहे की, मानसिक आजारांवरील उपचारासाठी विमा स्तरावर विस्तार करण्यातयावा. जेणेकरुन मानसिक आजारांवरील उपचारांचा समावेश विमा संरक्षणामध्ये करावा. त्याबाबतचे आदेश देण्यात यावे अशी मागणी याचिकेत केली आहे. दरम्यान, अभिनेता सुशांतसिंग राजपूत हा नैराश्य आणि मानसिक आजारांविरुद्ध लढत असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.सुशांतच्या आत्महत्येनंतर मानसिक आरोग्याबाबतच्या चर्चा अधिक वाढल्या आहेत.
न्यायमूर्ती रोहिग्टन फली नरीमन, नवीन सिन्हा आणि बी.आर. गवई यांनी नोटीस याचिकेवर नोटीस पाठवून केंद्र आणि आयआरडीएकडून उत्तर मागितले आहे. अधिवक्ता गौरव कुमार बन्सल यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, ऑगस्ट 2018 मध्ये आयआरडीए च्या आदेशानंतरही मानसिक आरोग्याची देखभाल अधिनियम 2017 च्या कलम 21 ची कोणतीही विमा कंपनी पालन करत नाही. (हेही वाचा, अभिनेता गोविंदा मानसिक आजारांनी त्रस्त? जवळच्या मित्राने केला धक्कादायक खुलासा; वाचा सविस्तर)
मानसिक आजारावर उपचार करणाऱ्यासाठी येणाऱ्या खर्चाचा समावेश विमा संरक्षणात करावा असे आदेश केंद्र सरकार आणि आयआरडीए ला द्यावेत अशी मागणी याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केला आहे.