अभिनेता गोविंदा मानसिक आजारांनी त्रस्त? जवळच्या मित्राने केला धक्कादायक खुलासा; वाचा सविस्तर
Govinda (Photo Credits: File Image)

बॉलिवूड मध्ये हटके सिनेमा, गाणी आणि त्याहूनही भारी डान्स स्टेप्स वर ज्याने अक्ख्या पिढीला भुरळ पाडली असा अभिनेता गोविंदा (Govinda)  मागील काही दिवसांपासून मानसिक आजारांनी त्रस्त असल्याचे धक्कादायक विधान समोर आले आहे. आश्चर्य म्हणजे हे विधान गोविंदाच्या अत्यंत जवळच्या मित्राने केले आहे. मानसिक तणावामुळे गोविंदाच्या वैयक्तिक जीवनात तसेच प्रोफेशनल संबंधात अनेकांशी वारंवार भांडण होत आहेत परिणामी त्या नात्यात कटुता येऊन आताच्या घडीला इंडस्ट्री मध्ये तरी गोविंदाचा कोणीही जवळचा मित्र नसल्याचे देखील या मित्राने म्हंटले आहे. केवळ 300 रुपयांत अंशुला कपूर चं Fankind घडवणार चाहत्यांना सेलिब्रिटींची भेट

एका हिंदी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, गोविंदा मानसिक आजरामुळे कामाच्या मोठमोठ्या ऑफर्स विचार न करताच उडवून लावत आहे आणि ही नकारात्मकता त्याच्यासाठी घातक सिद्ध होत आहे, असे त्याच्या मित्रांचे मत होते. दरम्यान गोविंदाचा शेवटचा सिनेमा रंगीला राजा मुळे त्याने अनेकांशी पंगे घेतले होते ज्यामुळे ही फिल्म घेण्यासाठी कोणीच तयार नव्हते. वारंवार इतरांना शिवीगाळ करणं, भांडण करणं यामुळेच आत सर्वजण त्याच्यापासून दुरावत चालले आहेत असेही त्याचे मित्र म्हणाले. या विधानानंतर गोविंदा किंवा तयचय कुटुंबातील सदस्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

मिशन मंगल' वादाच्या भोवऱ्यात; 'मनसे'ने केला 'या' गोष्टीला तीव्र विरोध

 अलीकडेच गोविंदाने रजत शर्मा यांच्या आप की अदालत या प्रसिद्ध शो मध्ये पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. ज्यात त्याने हॉलिवूडच्या अवतार या आपल्याला सिनेमासाठी आपल्याला विचारण्यात आल्याचे सांगितले. पण सिनेमाचे शूटिंग तब्बल 410 दिवस चालणार असल्याने तसेच आपल्याला शरीराला रंग लावायचा नसल्याने आपण ही फिल्म नाकारली असाही खुलासा त्याने केला. इतकंच नव्हे तर अवतार या सिनेमाचे नाव सुद्धा आपणच सुचवल्याचा दावा गोविंदाने केला. यानंतर गोविंदाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता, अनेकांनी त्याची खिल्लीही उडवली होती.