केवळ 300 रुपयांत अंशुला कपूर चं Fankind घडवणार चाहत्यांना सेलिब्रिटींची भेट
Anshula Kapoor (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधील (Bollywood) आपल्या आवडत्या कलाकाराला भेटता यावे हे कित्येकांचे स्वप्न असते. आपल्या लाडक्या कलाकाराची एक नुसती एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते त्यां घराबाहेर रात्रं-दिवस उभे राहतात किंवा त्यांच्या शुटिंग सेटवर एकच गर्दी करतात. कलाकाराला प्रत्यक्षात पाहणे हा एकच हेतू त्यामागे असतो. अशा अनेक बॉलिवूड चाहत्यांसाठी अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) ची बहिण अंशुला कपूर (Anshula Kapoor)  ने एक भन्नाट प्लान आणलाय. तुमच्या लाडक्या कलाकाराला भेटता यावे म्हणून अंशुला ने 'फॅनकाइंड' (Funkind) नावाची एक वेबसाईट लाँच केली आहे. या वेबसाइटवर चाहत्यांना केवळ 300 रुपयांचे रजिस्ट्रेशन केल्यास त्यांना त्यांच्या लाडक्या कलाकराला भेटण्याची संधी मिळणार आहे.

न्यूज 18 ने दिलेल्या रिपोर्टनुसार, चाहत्यांचे रजिस्ट्रेशन आणि फी वेबसाइटवर जमा झाल्यानंतर लकी ड्रॉ काढून भाग्यवान विजेत्याला आपल्या आवडत्या कलाकाराला भेटता येणार आहे. इतकच नव्हे तर, त्या बॉलिवूड कलाकारासोबत चाहत्याला पुर्ण एक दिवस घालवता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

Another one in the #WhereThemEyesAt series 🤦🏽‍♀️ #KapoorEyes 👀

A post shared by Anshula Kapoor (@anshulakapoor) on

इतकच नव्हे तर, जमा झालेले पैसे हे सामाजिक संस्थेला दान करण्यात येणार आहे. असे सांगण्यात येत आहे की, या मोहिमेअंतर्गत मिळणा-या धनराशीचा चांगल्या आणि सामाजिक कामासाठी वापर करता येणार आहे. मात्र अजूनपर्यंत हे स्पष्ट झाले नाही की जमा झालेले पैसे कोणत्या संस्थेला देण्यात येईल.

हेही वाचा- नाशिक: सलमान खानच्या चाहत्याचा पराक्रम; 'भारत'साठी बुक केले संपूर्ण थिएटर

असे सांगितले जात आहे की, बॉलिवूड कलाकारांच्या यादीत सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), आलिया भट्ट (Alia Bhatt), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावे आहेत. इतकच नव्हे तर बॉलिवूड कलाकारांव्यतिरिक्त व्यावसायिक आणि क्रिडा क्षेत्रातील देखील अनेक दिग्गज लोकांचा या यादीत समावेश आहे.