Subramanian Swamy on Gautam Adani: मोदी सरकार सोडतय गौतम अदानी यांचा हात; सुब्रमण्यम स्वामींचा थेट निशाणा
Gautam Adani (PC - PTI)

हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) संस्थेचा अहवाल येताच गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या साम्राज्याला जोरदार धक्के बसू लागले आहेत. इतके की, भारतीय शेअर बाजारात अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे समभाग धडाधड कोसळत आहेत. इतकेच नव्हे तर, अदानी समूहाच्या तब्बल तीन कंपन्या एक्सचेंजच्या नजरकैदेत आल्या आहेत. त्यामुळे या सर्व कंपन्यांवर आता बीएसई (BSE) आणि एनएसईच्या (NSE) अल्पकालीन अतिरिक्त पाळत ठेवली जाईल. ज्याला एएसएम (ASM) फ्रेमवर्क म्हटले जाते. दुसऱ्या बाजूला गैतम अदानी यांची जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतूनही घसरण झाली आहे. हे कमी की काय म्हणून आता अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स आता डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्सेसमधून काढून टाकले जात आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर भाजपचे माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी अदानींच्या मुद्द्यावरुन थेट मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट शब्दांत म्हटले आहे की, गौतम अदानी आणि अदानी समूह प्रकरणातून मोदी सरकार हळूहळू काढता पाय घेत आहे. मोदी सरकार हे अदानींचा हात सोडत आहे. स्वामींनी म्हटले आहे की, केंद्र सरकार हळूहळू अदानींना नाकारत आहे. इतकेच नव्हे तर जे भराभर येते ते भराभर निघूनही जाते, असा टोलाही स्वामी यांनी अदानींना लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे की, स्वत:ची प्रतिमा सांभाळण्यासाठ आणि आपले हात रिकामे ठेवण्याासठी ते मित्राची साथ सोडायलाही कमी करणार नाहीत. (हेही वाचा, Gautam Adani यांचे ग्रह फिरले; अदानी समूहाच्या तीन कंपन्या ASM यादीत, S&P Dow Jones कडूनही समभाग वगळण्याची घोषणा)

ट्विट

ट्विट

गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत तीसरा व्यक्ती ठरले होते. दरम्यान, हिंडेनबर्ग प्रकरण उपटले आणि अदानींना जोरदार झटका मिळाला. इतका की, त्यांच्या वैयक्तिक संपत्तीत गुरुवारी 24 अब्ज डॉलरची घट झाली. शेअर बाजारातील त्यांच्या कंपन्यांचे मूल्यी मोठ्या वेगाने कमी झाले. आता तर अदानींची घसरण इतकी भयावह पद्धतीने सुरु आहे की, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमथ्ये ते थेट 22 व्या स्थानावर घसरले आहेत. सांगितले जात आहे की, आगामी काळात अदानींच्या समभागांची आणखी घसरण होऊ शकते.