जगातील सर्वात उंच पुतळ्याचे सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्मारकाचे आज अनावरण होणार आहे. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 143 वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधत आज या स्मारकाचे अनावरण करण्यात येणार आहे. सरदार पटेल यांचे स्मारक जगातील सर्वात उंच पुतळा असून त्याची उंची 182 मीटर आहे.
हा पुतळा वडोदराजवळच्या नर्मदा जिल्ह्यात असलेल्या सरदार सरोवर बांधावर उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुतळ्याचे अनावरण करतील. भाजपाने या सोहळ्याची जय्यत तयारीही केली आहे. गेल्या काही दिवासांपासून हा पुतळा चर्चेचा विषय ठरत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि देशाच्या जडणघडणीत सरदार वल्लभभाई पटेलांचे फार मोठे योगदान आहे. त्यांना लोहपुरूष म्हणून ओळखलं जातं. स्टॅच्यू ऑफ युनिटी : सरदार पटेलांचा 182 मीटर उंचीचा पुतळा तयार ; ही आहेत पुतळ्याची वैशिष्ट्ये
गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींची अशी इच्छा होती की, "सरदार पटेलांचा असा पुतळा उभारावा ज्याची उंची सर्वाधिक असेल."आणि मोंदीची ही इच्छा पूर्ण होत आहे. त्याचबरोबर अनावरण सोहळ्यात मोदी काय बोलणार याकडेही देशाचे लक्ष लागले आहे.