जगभरातून टाळेबंदी (Layoffs) आणि कर्मचारी कपातीच्या बातम्या येत असताना काही स्टार्टप्समध्ये (Startups) मात्र जोरदार वाढ होताना दित आहे. असे असले तरी त्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये मात्र वाढ झाली नाही. खास करुन एप्रिल (2022) महिन्यात काही क्षेत्रांमध्ये मात्र नोकरभरतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पांढरपेशी नोकऱ्यांमध्ये झालेल्या ई-भरतीत (e-recruitment) 6% नी घट झाली आहे. फाउंडिट (foundit (Previously Monster India & APAC) च्या अहवालानुसार, मासिक 4 टक्क्यांनी घट झाली आहे, जी भारतीय भर्ती करणार्यांमध्ये सावधगिरीची भावना दर्शवते.
नोकऱ्यांमध्ये घट झालेली क्षेत्रे
BFSI (+3 टक्के)
प्रवास आणि पर्यटन (+2 टक्के)
आयात/निर्यात (+13टक्के)
दरम्यान, प्रती महिना (MOM) आधारावर वाढीचा आकडा पाहिला तर इतर क्षेत्रे, जसे की लॉजिस्टिक, गृह उपकरणे, आणि तेल आणि वायू यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान, नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी स्टार्टप्समध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे नव्या नोकऱ्यांच्या संधी भविष्या वाढू शकतात. याबाबत शेखर गरिसा यांनी म्हटले आहे की, नोकरी कमी झाली असली तरी, नोकरी शोधणाऱ्यांसाठी उदयोन्मुख उद्योगांमध्ये नोकरीच्या भरपूर संधी आहेत. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमने एक वळण घेतले आहे, प्रचलित रोजगार बाजारपेठेतील आव्हानांना न जुमानता नोकरी देण्याच्या हेतूने लवचिकता प्रदर्शित केली आहे. (हेही वाचा, Intel Layoffs: इंटेलमध्ये पुन्हा होणार कर्मचारी कपात, खर्च कमी करण्यासाठी घेणार कठोर निर्णय)
दिरम्यान, अहवालात असे दिसून आले आहे की, किरकोळ (22 टक्के), प्रवास आणि पर्यटन (19 टक्के) हे वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर सकारात्मक वाढ दर्शविणारे शीर्ष उद्योग आहेत, तर बीएफएसआय (-4 टक्के) आणि बीपीओ (-13) टक्के) क्षेत्रे चिंताजनक आहेत.
स्टार्टअप्समधील एकूण भरतीच्या मागणीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत या एप्रिल 2023 मध्ये 19 टक्के (वर्षानुवर्षे) वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय, बहुतांश शहरांमध्ये नोकरभरतीत एकंदरीत घट दिसून आली, तर बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीतील स्टार्टअप्सने व्यावसायिकांची सर्वाधिक मागणी केली. पदवीपेक्षा कौशल्ये आता अधिक महत्त्वाची आहेत, हे एका अभ्यासात 10 पैकी 8 भारतीय व्यावसायिकांनी उघड केले आहे.