Kashmir IGP | X @ANI

पहलगाम (Pahalgam terror attack) मध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर च्या प्रत्युत्तर दिले आहे. सध्या ऑपरेशन स्थगित असले तरीही सैन्यदलाचा दहशतवादाविरूद्धचा लढा सुरूच आहे. कश्मीर मध्ये कानाकोपर्‍यात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना सध्या सैन्यदलाकडून लक्ष्य केले जात आहेत. कश्मीर मध्ये मागील तीन तासांमध्ये सहा कट्टर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

आज पत्रकार परिषदेमध्ये GOC Victor Force Major General Dhananjay Joshi यांनी याबद्दल माहिती दिली आहे. दक्षिण कश्मीर मध्ये दोन मोठी ऑपरेशन्स हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. लष्कराने शोपियान मध्ये केलर भागात तर पुलवामा च्या त्राल मध्ये दहशतवाद्यांचा शोध घेतला. हे ऑपरेशन CRPF, Army आणि JK Police यांनी हातात घेतले होते.त्यांच्या समन्वयाने 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

मार्च महिन्यात जम्मू कश्मीर मध्ये झालेल्या एका सरपंचाच्या हत्येत सहभागी दहशतवाद्याचादेखील खात्मा झाला आहे. केलरमधील उंच भागात दहशतवादी असल्याची माहिती 12 मे रोजी लष्कराला मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी काही हालचाल दिसल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आव्हान दिले पण त्यांनी गोळीबार करून प्रत्युत्तर दिले. नक्की वाचा: Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं .

Dhananjay Joshi, यांनी दिली ऑपरेशनची माहिती

"ठार करण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक, शाहिद कुट्टे, हा दोन मोठ्या हल्ल्यांमध्ये सहभागी होता. ज्यामध्ये एकात त्याने जर्मन पर्यटकावरील हल्ला केला होता. त्याचा निधी पुरवण्यातही हात होता," असे मेजर जनरल जोश म्हणाले.

पुलवामामध्ये मारले गेलेले तीन दहशतवादी जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चे होते. त्यांची ओळख आसिफ अहमद शेख, अमीर नजीर वाणी आणि अहमद भट अशी झाली आहे.