Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं

ऑपरेशन केलर हे जम्मू आणि काश्मीरमधील शोपियां येथील शुक्रू केलर भागात भारतीय सैन्याने सुरू केलेली “search and destroy” मोहीम होती.

Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Operation Keller | X @adgpi

पहलगाम च्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिल्यानंतर आता जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन केलर (Operation Keller) हाती घेतलं होतं. जम्मू-काश्मीरमधील Shopian जिल्ह्यातील केलर(Keller) जंगलात दहशतवादी असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली होती. माहितीच्या आधारे, 13 मे 2025 रोजी भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्त कारवाई सुरू केली.

ऑपरेशन केलर मध्ये चकमकीनंतर एलईटी/टीआरएफच्या स्थानिक कमांडरसह तीन कट्टर दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. हे तिघेही या भागातील अलिकडच्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होते. या कारवाईतून जप्त केलेल्या एके सीरीज मधील रायफल्स, मोठ्या प्रमाणात दारूगोळा, ग्रेनेड आणि इतर युद्धासारख्या वस्तूंचा समावेश आहे. या कारवाईचे यश सर्व सुरक्षा दल आणि गुप्तचर संस्थांमधील उत्कृष्ट समन्वयाचे परिणाम आहे. दहशतवादाचा नायनाट करण्याच्या आपल्या मोहिमेत भारतीय लष्कराचा पुढाकार आहे. शांतता भंग करण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला निर्णायक आणि निर्दयी शक्तीने तोंड दिले जाईल अशी प्रतिक्रिया भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.

Operation Keller ने काय साधलं?

भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार या कारवाईदरम्यान तीन "कट्टर दहशतवादी" मारले गेले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) टॉप कमांडर शाहिद कुट्टेसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने तीन मृत दहशतवाद्यांपैकी दोघांची ओळख शाहिद कुट्टे आणि अदनान शफी अशी केली आहे, तर तिसऱ्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

भारतीय लष्कराने दिली माहिती

शाहिद कुट्टे 2023 मध्ये दहशतवादी गटात सामील झाला होता आणि तो "A" श्रेणीचा दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा एक टॉप कमांडर होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू कश्मीर मध्ये अनेक दहशतवाद्यांची घरं उद्धवस्त करण्यात आली त्यामध्ये शाहिद कुट्टे च्या घराचाही समावेश असल्याचं सांगितलं जातं.

(The above story first appeared on LatestLY on May 14, 2025 04:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).