चीन मधील कोरोना व्हायरसचे जाळे दिवसेंदिवस देशाबाहेर पसरत चालले आहे. तर जागतिक बाजारात सुद्धा कोरोना व्हायरसमुळे नुकसान झाले आहे. याचा परिणाम आता मुंबईतील शेअर बाजारावर झाला असून आज दिवसाच्या सुरुवातील सेनसेक्स 410 पेक्षा अधिक अंकांनी कोसळला असून 40,737.55 पोहचला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांचा निफ्टी सुरुवातीला 135.85 अंक किंवा 1.13 टक्क्यांच्या नुकसानीने11,945 वर पोहचला आहे. तसेच टाटा स्टील कंपनीच्या शेअरला चार टक्क्यांनी नुकसान पोहचले आहे.
दुसऱ्या आशियाई बाजारात सुरु असलेल्या घसरणीचा परिणाम शेअर बाजारावर सुद्धा झाला आहे. चीन मध्ये वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसमुळे साउथ कोरिया, इटली आणि मध्ये आशिया येथे कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तसेच जागतिक स्तरावर कोरोनामुळे मृतांच्या आकडेवारीत सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपयात 24 पैशांनी घसरण झाल्यानंतर 71.89 वर पोहचला.
आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेनसेक्स 393.57 अंक म्हणजेच 0.96 टक्क्यांनी घसरुन 49,776.55 वर पोहचला. तर निफ्टी 91.75 अंक म्हणजेच 0.76 टक्क्यांनी कमी होत 11,989.10 वर आला. गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याकडे लागले आहे. या दोन देशांमध्ये होणाऱ्या व्यापार संबंधित काय निर्णय घेतला जाईल हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.(भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मी चा फोटो छापा- सुब्रमण्यम स्वामी)
तर दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या वेळेस मुंबई मध्ये शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स तब्बल 328 अंकांनी वर आला असून 41,308.16 वर पोहचला होता. तर निफ्टी मध्ये सुद्धा 107.20 पॉइंट्सची वाढ झाली असून 12,135.80 चा टप्पा गाठला होता. याशिवाय सकाळीच डॉलरच्या तुलनेत रुप्याच्या किंमतीत आठ पैश्याने वाढ झाली होती.