अजूनही भारतीय संस्कृतीमध्ये सेक्स (Sex) ही एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल उघड बोलणे निषिद्ध मानले जाते. अनेक लोक स्वतःहून याबद्दल बोलणेदेखील पसंत करत नाहीत. पण आता लोकांची मानसिकता हळूहळू बदलत आहे. अलीकडेच देशभरातील अनेक शहरांमध्ये इंडिया टुडेने सेक्सबाबत एक सर्वेक्षण केले. यामध्ये भारतीय लोक लैंगिक संबंधाबद्दल काय विचार करतात यासंबंधित अनेक प्रश्न विचारले गेले. यामध्ये चक्क 28 टक्के लोकांनी आपण ऑफिसमध्ये सेक्स केला असल्याची कबुली दिली आहे. चला सविस्तर जाणून घेऊया याबद्दल लोकांचे काय आहे मत
या सर्वेक्षणात लोकांना विचारले गेले की, त्यांनी ऑफिसमध्ये कधी सेक्स केला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना दिल्लीतील सुमारे 28 टक्के लोकांनी ‘हो’ असे उत्तर दिले आहे. याचा अर्थ असा की, कार्यालयाच्या आवारात शारीरिक संबंध ठेवण्यात दिल्लीवासी आघाडीवर आहेत. दिल्लीनंतर कोणते मेट्रो शहर नव्हे तर एका छोट्या शहराचा नंबर लागतो ते म्हणजे रांची. तेथील 19.5 टक्के लोकांनी आपण ऑफिसमध्ये सेक्स केला असल्याची कबुली दिली आहे. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि गुडगावमधील 100% लोकांनी या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’, असे दिले आहे. याचा अर्थ असा की एनसीआरच्या या दोन शहरांमधील लोकांनी कार्यालयात कधीही सेक्स केला नाही. (हेही वाचा: The Supergirl Sex Position: लिंगाचा आकार लहान असला तरी पार्टनरला द्या परमोच्च सुख; ट्राय करा 'द सुपरगर्ल सेक्स पोझिशन)
याशिवाय इंदूर, कोलकाता आणि चंदीगडमधील 99 टक्के लोकांनीही आपण कार्यालयात शारीरिक संबंध ठेवण्याच्या प्रश्नाला उत्तर ‘नाही’ असे दिले आहे. या व्यतिरिक्त लोकांनाही विचारण्यात आले की, त्यांना ऑफिसमध्ये सेक्स करायला आवडेल का? या प्रश्नाला उत्तर देताना लखनौच्या 48 टक्के, चेन्नईतील 42 आणि गुरुग्रामच्या 43 टक्के लोकांनी आपल्याला कार्यालयात सेक्स करायला आवडेल असे सांगितले आहे.