विक्रम संवत 2077 (Vikram Samvat 2077) सण 16 नोव्हेंबर ला पार पडताच आज मुंबई शेअर बाजार (Mumbai Share Market) उघडताच सेन्सेक्सने (Sensex) चांगलीच उसळी घेतली आहे. काल पाडव्यामुळे मुंबई शेअर बाजार बंद होते. मात्र आज शेअर बाजार उघडताच जबरदस्त उसळी घेत 44,095.85 वर पोहोचला आहे. तर निफ्टी (Nifty) 13 हजाराच्या आसपास म्हणजेच 12,934.05 वर पोहोचला आहे. कोविड-19 महामारीच्या काळात शेअर बाजारात ही ऐतिहासिक उसळी आहे. त्यामुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबई शेअर बाजार उघडताच BSE चा 30 शेअरचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 457.87 पॉइंट्ससह 44,095 वर पोहोचला आहे. तर NSE चा 50 शेअरचा प्रमुख इंडेक्स निफ्टी 152.25 पॉइंट्ससह 12,932.50 वर पोहोचला आहे. हेदेखील वाचा- Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण; पाहा काय आहे? सोन्याचा आजचा भाव

तर सोन्याच्या किंमतीत आज 210 रुपयाची घट झाली असून 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी आता 50 हजार 750 रुपये द्यावी लागणार आहे. सोन्याच्या दरात मागील महिनाभरापासून चढ उतार पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे सराफा व्यवसायिकांचीही चिंता वाढली होती. मुंबईत (Mumbai) आज सोन्याचा भाव 49 हजार 750 इतका आहे.

मागील आठवड्यापासून सोन्याच्या किंमत सतत बदल पाहायला मिळाला आहे. दिवाळी सणानिमित्त सोन्याच्या भागात गेल्या चार दिवसात सलग वाढ झाली होती. गुड रिटर्न बेवसाईट्सनुसार, 12 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 49 हजार 760, 13 नोव्हेंबर रोजी 49 हजार 870, 14 नोव्हेंबर रोजी 49 हजार 950, 15 नोव्हेंबर रोजी 49 हजार 960 इतका होता. मात्र, सोमवारी सोन्याचा भाव 49 हजार 750 वर पोहचला आहे.