
कोरोनामुळे लॉकडाऊन, अनलॉकिंगनंतर उर्वरित बाजारात व्यापार काहीसे ठप्प झाले होते. परिणामी, आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या. ज्यामुळे भारतीय सराफा बाजारात मोठी तेजी आली होती. मात्र, आज त्यात नफावसुली झाली आहे. सोन्याच्या किंमतीत आज 210 रुपयाची घट झाली असून 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी आता 50 हजार 750 रुपये द्यावी लागणार आहे. सोन्याच्या दरात मागील महिनाभरापासून चढ उतार पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे सराफा व्यवसायिकांचीही चिंता वाढली होती. मुंबईत (Mumbai) आज सोन्याचा भाव 49 हजार 750 इतका आहे. सोन्याच्या दरात होत असलेले चढ उतार पाहता सोन्यात गुंतवणूक करावी की नाही? असा प्रश्न ग्राहकांच्या मनात उपस्थित होत आहे.
मागील आठवड्यापासून सोन्याच्या किंमत सतत बदल पाहायला मिळाला आहे. दिवाळी सणानिमित्त सोन्याच्या भागात गेल्या चार दिवसात सलग वाढ झाली होती. गुड रिटर्न बेवसाईट्सनुसार, 12 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 49 हजार 760, 13 नोव्हेंबर रोजी 49 हजार 870, 14 नोव्हेंबर रोजी 49 हजार 950, 15 नोव्हेंबर रोजी 49 हजार 960 इतका होता. मात्र, सोमवारी सोन्याचा भाव 49 हजार 750 वर पोहचला आहे. हे देखील वाचा- Gold Rate On Diwali Padwa 2020: दिवाळी पाडव्या दिवशी काय आहे सोनं, चांदीचा दर? पहा प्रमुख शहरांमधील सोन्याचा भाव
शुद्ध सोने कसे ओळखले जाते?
सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.
दरम्यान कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगावर ओढावल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. दरम्यान, आता संपूर्ण देश अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. ज्यामुळे लवकर आपल्या देशावर आलेले आर्थिक संकट दूर होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.ृ