शहरांची नावे बदलण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. हिंदू धर्म कट्टरतेला परवानगी देत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांच्या वतीने ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत न्यायालयाने केंद्र सरकारला 'नामांतर आयोग' स्थापन करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती. परकीय आक्रमकांनी बदललेल्या देशातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांची मूळ नावे शोधून पुनर्संचयित करण्यासाठी 'नामांतर आयोग' स्थापन करावा, अशी मागणी याचिकेत केली होती.
ही याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, ‘हिंदू धर्म हा धर्म नाही, तर जीवनपद्धती आहे. हिंदू धर्म कट्टरतेला परवानगी देत नाही. त्याची महानता समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्याही विशिष्ट हेतूसाठी त्याचा वापर करू नका.’ न्यायमूर्ती बी.व्ही. नगररत्न म्हणाल्या की, हिंदू धर्म जीवनपद्धती असल्याने, भारताने सर्वांना आत्मसात केले आहे व त्यामुळेच आम्ही एकत्र राहू शकलो. इंग्रजांच्या फूट पाडा आणि राज्य करा या धोरणामुळे समाजात फूट निर्माण झाली होती. आम्हाला ते परत नको आहे.’
#Hinduism #SupremeCourtOfIndia pic.twitter.com/cEmwOkzWrj
— Live Law (@LiveLawIndia) February 27, 2023