SBI मधील ग्राहकांच्या खात्यातून फसवणूकदारांकडून लूटमार, बचाव करण्यासाठी बँकेने सांगितले 'हे' उपाय
Representational Image (Photo Credits: PTI)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)  यांनी त्यांच्या खातेधारकांना फिशिंगच्या प्रकरणापासून बचाव करण्यापासून अलर्ट राहण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे घरात अडकून पडलेले नागरिक सध्या नेट बँकिंगचा सर्वाधिक वापर करत आहेत. परंतु यामुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे ही प्रकार वाढत आहेत. एसबीआयचे 7 कोटी 50 लाख ग्राहक इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करत आहेत. तसेच 1 कोटी 70 लाख जण हे मोबाईल बँकिंगच्या सेवेचा लाभ घेत आहेत. तर एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. एसबीआयने एक ट्वीट करत असे म्हटले आहे की, फिशर्स पासून सावध रहा. इंटरनेटवर तुम्हाला माहितीपासून बचाव करा.

फिशिंग म्हणजे एक व्यक्ती बनावट ईमेल, वेबसाईटचा वापर करुन नागरिकांना फसवतो. तसेच नागरिकांना लॉगिन आणि अन्य डिटेल जसे पत्ता, संपर्क क्रमांक आणि जन्म तारीख सारखी खासगी माहिती देण्यास सांगतात. तसेच कोणत्याही ईमेल किंवा वेब लिंकवर क्लिक केल्यास ती खरी वाटून खरंतर नागरिकांना खोट्या वेबसाईट्सवर नेले जाते.(SBI CBO Recruitment 2020: पदवीधर तरूणांसाठी एसबीआय मध्ये 3850 जागांसाठी नोकरभरती; sbi.co.in वर 16 ऑगस्टपूर्वी करा अर्ज)

>>कसा कराल बचाव?

-कोणत्याही अज्ञात संस्थेकडून आलेली फाईल सुरु किंवा डाऊनलोड करु नका.

-एखादी व्यक्तिगत माहिती देण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचा ईमेल आयडी पहा.

-अॅन्टीव्हायरस, अॅन्टीस्पायवेअर आणि फायरवॉल सारख्या सॉफ्टवेअरचा वापर जरुर करा.

-तुमच्या वेब ब्राउजरला नेहमीच अपडेट करत रहा आणि फिशिंग फिल्टर सुद्धा अॅक्टिव्ह असू द्या.

>>'या' गोष्टी करु नका

-संशयित ईमेल किंवा सोशल मीडियातील मेसेजला उत्तर देऊ नका.

-व्यक्तिगत गोष्टींसाठी कंपनीचा ई-मेल चा वापर करु नका.

-बँक खात्याची माहिती विचारणाऱ्या फोन पासून दूर रहा.

-एखादी ऑफर किंवा अवॉर्ड मिळाले असल्याचे येणाऱ्या फोन कॉल्सवर व्यक्तिगत माहिती देऊ नका.(COVID-19 Lockdown: एप्रिल ते जुलै दरम्यान 80 लाखांहून अधिक पीएफ धारकांनी काढली 30,000 कोटींची रक्कम)

20 जूनला सरकारने एक मोठ्या फिशिंग हल्ल्याप्रकरणी अलर्ट केले होते. त्यानुसार संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसची फ्री चाचणी केली जात असल्याचा दावा केला जात होता. एसबीआयने एक नवी मार्गदर्शक सुचना जाहीर करत असे म्हटले होते की, सायबर क्रिमिनल 2 मिलियन व्यक्तिगत/नागरिकांच्या ईमेल आयडीचा दावा करत आहेत. यासाठी नागरिकांना ईमेल पाठवले जात असल्याचे ही सांगण्यात आले आहे.