Image used for representational purpose. (Photo Credit: File)

ATM किंवा डेबिट कार्ड च्या माध्यमातुन होणार्‍या फसवणुकीला आळा घालण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (State Bank Of India) यंदा नववर्षाच्या सुरुवातीला एक नियम लागु केला होता ज्यानुसार ग्राहकांंना 10 हजारच्या वरील रक्कम एटीएम मधुन काढायची झाल्यास त्यांंना OTP टाकणे अनिवार्य करण्यात आले होते हाच नियम आता 18 सप्टेंंबर पासुन देशभरात दिवसातील 24  तासांंसाठी लागु करण्यात येणार आहे. तत्पुर्वी सर्व ग्राहकांंनी आपले बॅंक अकाउंट आणि मोबाईल क्रमांंक लिंंक करुन घ्यावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत. SBI ATM Cash Withdrawal Rules: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

प्राप्त माहितीनुसार नववर्षात जेव्हा हा नियम लागु झाला तेव्हा केवळ रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेसाठी हा नियम ठेवण्यात आला होता मात्र आता सुक्रवार 18 सप्टेंंबर पासुन हा नियम 24 तासांंसाठी लागु असणार आहे. त्यामुळे यापुढे SBI च्या कोणत्याहे एटीएम मधुन 10 हजाराच्या वरची रक्कम काढायची झाल्यास तुमचा मोबाईल जवळ असणे आणि हा मोबाईल क्रमांंक बॅंक अकाउंट ला लिंक असणंं अत्यावश्यक असणार आहे.

यापुर्वी स्टेट बँकेच्या निरिक्षणात समोर आलेल्या माहिती नुसार, एटीएममधील 68% चोऱ्या रात्रीच्या वेळी होतात. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हा मार्ग अवलंंबण्यात आला आहे. हा ओटीपी केवळ एका व्यवहारासाठी असणार आहे. दुसऱ्यांदा त्याचा वापर होणार नाही. तसेच हा ओटीपी काही मिनिटांसाठीच उपयुक्त असणार आहे. ग्राहकाने या कालावधीत व्यवहार पूर्ण केला नाही, तर तो ओटीपी निष्क्रिय होणार आहे यातुन चोर्‍यांंचे व फसवणुकीचे प्रकार कमी होतील अशी आशा एसबीआयने वर्तवली आहे.