Sanjay Gandhi Death Anniversary (Photo Credits-ANI)

Sanjay Gandhi 39th Death Anniversary: माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी  (Indira Gandhi) यांचे पुत्र व राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा लहान भाऊ संजय गांधी  (Sanjay Gandhi) यांची आज 39 वी पुण्यतिथी आहे. 23 जून 1980 ला एका विमान अपघातात संजय यांचा मृत्यू झाल्यावर गांधी कुटुंबासमवेत संपूर्ण देशाने हळहळ व्यक्त केली होती.यानिमित्त त्यांची पत्नी व भाजपा खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) तसेच त्यांचा मुलगा वरुण गांधी (Varun Gandhi)  यांनी त्यांच्या स्मृतीस वंदन करून श्रद्धांजली वहिली. संजय हे जरी काँग्रेस (Congress)  मधील महत्वाचे नेते असले तरी त्यांच्या पत्नी मनेका या भाजपा (BJP)  कडून लोकसभेत निवडून आल्या आहेत. Rajiv Gandhi Death Anniversary 2019: राजीव गांधी यांच्याविषयी माहिती नसलेल्या 5 इंटरेस्टिंग गोष्टी

ANI ट्विट

संजय यांच्या मृत्यूनंतर खरतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क मांडण्यात आले. पण त्यातील कुठल्याच दाव्याची पुष्टी अद्याप झाली नाहीये. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊयात विमान अपघाताच्या दिवशी नेमकं काय झालं होतं..

असा झाला संजय गांधींचा अंत

1976 मध्ये संजय गांधी यांना कमी वजानाचं विमान उडवण्याचा परवाना मिळाला.असं म्हणतात की, कोणी रस्त्यावर कार चालवेल अशा पद्धतीने संजय गांधी विमान चालवायचे, मे 1980 मध्ये इंदिरा गांधी यांनी संजय यांच्यासाठी पिट्स एस 2ए विमान भारतात आणले होते.संजयना या विमानाची चाचणी करायची होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगी मिळाली नाही. 20 जून 1980 ला तज्ञांकडून या विमानाची चाचणी करण्यात आली. व त्यानंतर 21 जून रोजी संजय यांनी पहिल्यांदा हे विमान उडवले. 22 जून रोजी त्यांनी पत्नी मनेका गांधी, आई इंदिरा गांधी, यांना घेऊन 40 मिनिटे उड्डाण केले.

Sanjay Gandhi Plain Crash (Photo Credits: artpictures.club)

23 जून ला सकाळी 7.58 च्या सुमारास संजय यांनी एका मित्रासोबत विमानात बसून टेकऑफ केले. यावेळी अनेक नियम मोडून त्यांनी दिल्लीच्या रहिवासी भागातून तीन फेऱ्या घेतल्या. मात्र चौथी फेरी घेणार इतक्यात विमानाचे इंजिन बंद झाल्याचे समजले यामुळे विमान भलतीकडेच वळून संतुलन गेला आणि तसेच ते जमिनीवर जाऊन आदळले.या विमान अपघातात संजय यांची प्राणज्योत कायमची मालवली.

संजय गांधी हे भारतीय राजकारणात इंदिरा गांधींचे उत्तराधिकारी म्हणून ओळखले जायचे. आणीबाणीच्या काळात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या चार वर्षात इंदिरा गांधी यांची देखील हत्या झाली आणि मग पंतप्रधान पदासह देशाची जबाबदारी राजीव गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली.