RSS ही भारतातील दहशतवादी संघटना आहे, त्यावर बंदी घाला; बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु राजरत्न यांची मागणी
Rajratna Ambedkar Slams RSS (Photo Credits: PTI, ANI)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar)  यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS)  संबंधित एक वादग्रस्त विधान केल्याचं व्हिडीओ सध्या समोर येत आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील दहशतवादी संघटना आहे, माझ्याकडे पुरावे आहेत त्यामुळे आरएसएसवर बंदी घाला अशी मागणी राजरत्न यांनी केली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi)  बाजूला एक साध्वी (Sadhvi) बसली आहे आणि ती मुलाखतीत सांगते की, भारतीय सैन्याजवळील दारूगोळा संपला, बंदुका, स्फोटकं संपली; तेव्हा आरएसएसनं स्फोटकं, दारुगोळा, बंदुका, बॉम्ब भारतीय सैन्याला पुरवले होते,' एवढा मोठा स्फोटकांचा साठा ठेवणारी ही दहशतवादी संघटना नव्हे तर आणखीन काय असा सवाल सुद्धा राजरत्न यांनी आपल्या भाषणातून केला आहे. RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात गुन्हा दाखल; पाहा काय आहे प्रकरण

राजरत्न यांनी आरएसएसकडे इतक्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब कुठून आले? इतका दारुगोळा कुठून आला? बंदुका कुठून आल्या? पंतप्रधानांच्या बाजूला बसून या साध्वी असं वक्तव्य करतात. ज्या घरांमध्ये दारुगोळा सापडला, ती घरे किंवा त्या घरांमधील मुलं-माणसांना दहशतवादी म्हणणार नाहीत काय? ज्या संघटनेकडे इतक्या मोठ्या प्रमाणात दारूगोळा आहे ती संघटना दहशतवादी नाही का? असे अनेक सवाल करत या व्हिडिओतून संघावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

पहा काय म्हणाले राजरत्न आंबेडकर

दरम्यान या अशाच संघटनेचं लोक दहशतवादी कारवायांमध्ये पकडले जात आहेत. अशा संघटनांवर जगात बंदी घालण्यात यावी.यासाठी आम्ही काम करत आहोत, असंही राजरत्न म्हणाले. या व्हिडिओवर आरएसएस कडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, मात्र येत्या काळात यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.