
Fake Bank Guarantee Scam: सीबीआयने 183.21 कोटी रुपयांच्या बनावट बँक हमी घोटाळ्याचा (Fake Bank Guarantee Scam) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) वरिष्ठ व्यवस्थापक गोविंद चंद्र हंसदा आणि मोहम्मद फिरोज खान यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण इंदूरस्थित कंपनी मेसर्स तीर्थ गोपिकॉन लिमिटेडने मध्य प्रदेश जल निगम लिमिटेड (एमपीजेएनएल) सोबत केलेल्या 974 कोटी रुपयांच्या तीन प्रकल्पांशी संबंधित आहे. 2023 मध्ये मेसर्स तीर्थ गोपिकॉन लिमिटेडने मध्य प्रदेशातील एमपीजेएनएलकडून 974 कोटी रुपयांचे तीन प्रकल्प मिळवले होते. या करारांना समर्थन देण्यासाठी कंपनीने 183.21 कोटी रुपयांच्या 8 बनावट बँक हमी सादर केल्या होत्या.
बनावट बँक हमीचा घोटाळा -
दरम्यान, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने 9 मे 2025 रोजी तीन वेगवेगळे खटले दाखल करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात, इंदूरस्थित कंपनीने मध्य प्रदेश जल निगम लिमिटेडला 183.21 कोटी रुपयांच्या बनावट बँक हमीचा घोटाळा उघडकीस आला. माहितीनुसार, सुरुवातीच्या पडताळणीदरम्यान, पीएनबी अधिकारी असल्याचे भासवून एमपीजेएनएलला ईमेल पाठवण्यात आले आणि बँक हमीची खोटी पुष्टी करण्यात आली. या बनावट पुष्टीकरणानंतर, एमपीजेएनएलने या कंपनीला 974 कोटी रुपयांचे तीन कंत्राट दिले.
याप्रकरणी सीबीआयने दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड आणि मध्य प्रदेशातील 23 ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात, पीएनबीचे वरिष्ठ व्यवस्थापक गोविंद चंद्र हंसदा आणि मोहम्मद फिरोज खान यांना 19 आणि 20 जून 2025 रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर, दोन्ही आरोपींना कलकत्ता न्यायालयात हजर करण्यात आले आणि ट्रान्झिट रिमांडवर इंदूरला आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी करण्यात आली.
सीबीआयकडून गुन्हा दाखल -
याप्रकरणी सीबीआयने टाटा कन्सल्टिंग इंजिनिअरिंग, बोस्कॅलिस स्मिट इंडिया एलएलपी, जान डी नल ड्रेजिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि जेएनपीटी मुंबईच्या तत्कालीन मुख्य व्यवस्थापकासह इतरांविरुद्ध गुन्हेगारी कट, फसवणूक आणि सरकारी कर्मचाऱ्याने केलेल्या गुन्हेगारी वर्तनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.