लाल भेंडी (Red Ladyfinger) सध्या देशभरातील शेतकरी आणि कृषी वर्तुळात आकर्षण तसेच चर्चेचा विषय ठरली आहे. लाल भेंडी हा शब्द उच्चारताच कदाचित अनेकांच्या डोळ्यासमोर वेगळी रंगसंगती आली असेल. कारण आपल्या पूर्वजांपासून आतापर्यंत आपण सर्वसामान्यपणे हिरवी भेंडी पाहात आणि खात आलो आहोत. त्यामुळे लाल भेंडी म्हटले की अनेकांच्या भूवया उंचावू शकतात. पण खरोखरच अशी भेंडी बाजारात आली आहे आणि तिची किंमतही (Red Ladyfinge Price) थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 800 रुपये किलो इतकी आहे.
भोपाळ (Bhopal ) येथील खजूरीकलां (Khajuri Kalan) गावातील एक शेतकरी मिश्रीलाल राजपूत यांनी या भेंडीची निर्मिती केली आहे. मिश्रीलाल राजपूत हे बनारस येथील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ वेजिटेबल रिसर्च सेंटर (ICAR-Indian Institute of Vegetable Research) मध्ये गेले होते. तेथे त्यांना पहिल्यांदा लाल भेंडी संदर्भात माहिती मिळाली. त्यांनी याची माहिती घेऊन लाल भेंडी त्यांच्या शेतात उगवूनही दाखवली. खरे तर लाल भेंडी हे विदेशी पिक आहे. त्यामुळे ती भारता उत्पादीत होईल कि नाही याबाबत अनेकांना शंका होत्या परंतू, अखेर ती भारतीय मातीत रुजु लागली आहे.
लाल भेंडीचे झाड
भारतीय भाजी संशोधन संस्था (Indian Vegetable Research Institute) ने या भेंडीवर संशोधन करुन ती पिकवण्यास योग्य केली. ही भेंडी उत्पादित करण्यासाठी सुमाजेर 8 ते 10 वर्षांचा कालावधी लागला. भओपाळचे शेतकरी मिश्रीलाल वाराणसी यांनी 2400 रुपयांना 1 किलो लाल भेंडीचे बीयाने आणले आणि याच वर्षाच्या जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये त्याची लागवड केली. मग काय हळूहळू भेंडी रुजत गेली वाढत गेली. आजुबाजूच्या शेतकऱ्यांसाठीही हा एक उत्सुकतेचा विषय बनला. कारण त्यांना शेतामध्ये पहिल्यांदाच लाल भेंडी दिसत होती. (हेही वाचा, पंतप्रधान मोदी हे घ्या ४९० रुपये!, १९ टन बटाटा पिकवल्यावर शेतकऱ्याने पाठवली मनी ऑर्डर)
हिरव्या भेंडीच्या तुलनेत लाल भेंडी केवळ 45 ते 50 दिवसांमध्ये तयार होते. एका झाडाला कमीत कमी 50 भेंड्या लागतात. तसेच, एकरामध्ये हे गणीत करायचे तर एक एकर जमीनित कमीत कमी 40 ते 50 क्विंटल भेंडी सहज उत्पादीत होते. वातावरण जर चांगले असेल तर हीच भेंडी प्रति एकर 80 क्विंटलही निघू शकते.
एएनआय ट्विट
Madhya Pradesh | Misrilal Rajput, a Bhopal-based farmer, grows red okra (ladyfinger) in his garden.
"This is 5-7 times more expensive than ordinary ladyfingers. It's being sold at Rs 75-80 to Rs 300-400 per 250 gm/500 gm in some malls," he says pic.twitter.com/rI9ZnDWXUm
— ANI (@ANI) September 5, 2021
शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय बाब अशी की या भेंडीला रोग अथवा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत नाही. कारण या भेंडीचा रंग लाल असतो. लाल भेंडीच्या तुलनेत हिरव्या भेंडीचा विचार करायचा तर हिरव्या रंगाच्या भेंडीमध्ये क्लोरोफिल अधिक प्रमाणात असते. जे किटक आणि रोगराईला आकृष्ट करते. लाल भेंडीमध्ये क्लोरोफिलची मात्रा कमी असते. त्यामुळे त्याला किड लागण्याचे प्रमाण अगदीच अत्यल्प असते. या भेंडीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की या भेंडीत एंथेसाईनिन (Anthocyanin) नावाचा एक घटक असतो. जो गर्भवती महिलांसाठी फायदेशीर असतो. त्वचा उजळण्यासठी आणि लहानमुलांना मानसिक विकारांपासून दुर ठेवण्यासाठीही Anthocyanin घटक महत्त्वाचा ठरतो. शिवाय हृदयरोग, मधुमेह, कोलेस्ट्रोल आदी समस्येपासूनही ही भेंडी काहीसा दिलासा देऊ शकते, असे संशोधन सांगते.