
Reserve Bank of India कडून रेपो रेट (Repo Rate) मध्ये 25 बेसिस पॉईंट ने कपात केली आहे. आता रेपो रेट 6% करण्यात आला आहे. यामुळे कर्जासाठी ईएमआय कमी होणार आहेत. आज आरबीआय गर्व्हनर Sanjay Malhotra यांनी Monetary Policy सादर केली आहे त्यावेळी रेपो रेट मधील कपात जाहीर केली आहे. आरबीआय कडून यंदाच्या वर्षी दुसर्यांदा रेपो रेट मध्ये कपात झाली आहे. फेब्रुवारी मध्ये रेपो रेट 6.25% होता तो आता 6% करण्यात आला आहे.
रेपो रेट मध्ये कपात
#WATCH | Mumbai | says, " The MPC (Monetary Policy Committee) voted unanimously to reduce the policy by 25 basis points to 6 % per cent with immediate effect."
(Source: RBI) pic.twitter.com/rRVCJiTy0H
— ANI (@ANI) April 9, 2025
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट, ज्याला खरेदी करार दर असेही म्हणतात. हा आरबीआय व्यावसायिक बँकांकडून त्यांना कर्ज देणाऱ्या पैशांवर आकारला जाणारा व्याजदर आहे. म्हणून जेव्हा तो कमी केला जातो तेव्हा बँका अनेकदा त्याचे फायदे ग्राहकांना देतात.
आरबीआय गव्हर्नर यांनी आज दिलेल्या माहितीमध्ये Inflation सध्या लक्ष्यापेक्षा कमी आहे आणि अन्नधान्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे, असे Monetary Policy Committee ने नोंदवले आहे. या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज 20 बेसिस पॉइंटने कमी करण्यात आला आहे आणि वास्तविक जीडीपी वाढ आता 6.5 टक्के असा अंदाज आहे.
गृह कर्ज, वाहन कर्ज कमी होणार?
रेपो रेट कमी झाल्यानंतर, बँका गृहनिर्माण आणि वाहन यांसारख्या कर्जांवरील व्याजदर देखील कमी करू शकतात. जर व्याजदर कमी झाले तर घरांची मागणी वाढण्याचा अंदाज आहे. अधिक लोक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकतील. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळण्याचा अंदाज आहे. Documents For Home Loan: गृह कर्ज घेताय? तर 'हे' कागदपत्रं ठेवा तयार; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट .
जेव्हा अर्थव्यवस्था वाईट काळातून जाते तेव्हा पैशाचा प्रवाह वाढवण्याची गरज असते. अशा परिस्थितीत आरबीआय पॉलिसी रेट कमी करते. यामुळे बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज स्वस्त होते आणि ग्राहकांनाही स्वस्त दरात कर्ज मिळते.