Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशाची आर्थिक स्थिती आणि अर्थव्यवस्थेत आलेली मंदी (Recession) यावरुन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime minister Narendra Modi) यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा हल्ला चढवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'भारतात इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर मंदी आलेली आहे. भारताची ताकद मोदींच्या कमजोरीत बदलली आहे'.

रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने दिलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) देशाचा विकासदर अत्यंत नकारात्मक राहिला. जीडीप दर दुसऱ्या तिमाहीत 8-6 टक्क्यांवर घसरला. राहुल गांधी यांनी या आधीही यावरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन यांवर केंद्र सरकारवर नेहमीच टीका केली आहे.

नोटबंदी केल्याला चार वर्षे पूर्ण झाली. त्यावरुनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या श्रीमंत मित्रांना फायदा पोहोचविण्यासाठी नोटबंदी आणली. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. लोक रांगेत उभा राहिले. त्याचा ठोस फायदा काहीच झाला नाही. इतकेच नव्हे तर केंद्र सरकारने लॉकडाऊनही अचानक लावला. त्या आधी सरकारने कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. त्यामुळे असंख्य नागरिकांना पायी प्रवास करावा लागला. त्यासोबतच अर्थव्यवस्थेलाही मोठी हानी पोहोचले. (हेही वाचा, Atmanirbhar Bharat Rozgar Yojana: आत्मनिर्भर भारत 3 अंंतर्गत रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मोदी सरकारची नवी योजना जाहीर; पहा कुणाला फायदे!)

कोणत्याही नियोजनाशिवाय लागू केलेल्या लॉकडाऊन (Lock down) आणि आर्थिक धोरणांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. ज्याचा परिणाम आता मंदीमध्ये दिसतो आहे. सन 2020-21 पासून अर्थव्यवस्था अत्यंत ढासळलेली दिसत आहे. देशाचा विकासदरही अत्यंत घसरलेला पाहायला मिळत आहे.देशाचा विकासदर सातत्याने घसरताना दिसतो आहे.