राफेल डील: मोदी सरकारला अडचणीत आणणारे राहुल गांधी यांचे ५ प्रश्न
Prime Minister Narendra Modi and Congress President Rahul Gandhi | (Photo courtesy: collection, edit, representative image)

सत्ताधारी भाजप प्रणीत (BJP) एनडीए (NDA) आणि विरोधात असलेली काँग्रेस (Congress) प्रणीत युपीए (UPA) यांच्यात राफेलच्या मुद्द्यावरुन (Rafale Deal) सुरु असलेला संघर्ष काही केल्या थांबण्याचे नाव घेईना. संसद आणि संदेबाहेरही या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर जोरदार हल्ला करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) विरोधकांच्या हल्ल्याला मोजक्याच शब्दात उत्तर देत असले तरी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मात्र या मुद्द्यावर जोरदार आक्रमक आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारला राफेल मुद्द्यावरुन काही प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न कदाचित सत्ताधारी मोदी सरकारसाठी अडचणीचे ठरु शकतात.

राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारलेले पाच प्रश्न

  • राफेल विमान खरेदी प्रकरणात व्यवहारासाठी हिंदुस्तान एयरोनॉटिकल (HAL) या कंपनीसारखे सक्षम पर्याय असताना केंद्र सरकारने हे कंत्राट अनिल अंबानी यांनाच का दिले?
  • या व्यवहारावर संरक्षण मंत्रालयालाही काही आक्षेप असल्याची बाब समोर येत आहे. सरकारने हे स्पष्ठ करावे की, संरक्षण मंत्रालयाला आक्षेप असतानाही सरकारने या आक्षेपांकडे दुर्लक्ष करुन राफेल 36 विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलाच कसा?
  • राफेल विमानांची खरेदी व्यवहार 526 कोटी रुपयांना करण्याचे टरले असतान विमानांची किंमत 1600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलीच कशी?
  • 'ती' कोणत्या प्रकारची माहिती आहे जी मनोहर माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना माहिती आहे. पण, ती जनतेसमोर आणण्यासाठी त्यांना रोखण्यात येते आहे.
  • राफेल व्यवहार करताना एअरफोर्सचा सल्ला घेतला होता?

(हेही वाचा, राफेल डील: अरुण जेटली यांनी मला शिवी दिली, प्रश्नाचे उत्तर नाही: राहुल गांधी (व्हिडिओ))

दरम्यान, लोकसभा सभागृहात राफेल मुद्द्यावर आजही (शुक्रवार, 4 जानेवारी) चर्चा सुरु आहे. विरोधकांनी राफेल मुद्द्यावरुन उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामण सभागृहात उत्तर देत आहेत. या उत्तराने विरोधकांचे समाधान होणार का? याबाबत उत्सुकता आहे.