![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/09/Court-hammer-380x214.jpg)
जोडीदार जेव्हा मानसिक आजाराने ग्रासलेला असतो, त्याचा आजार असाध्य अवस्थेला पोहोचलेला असतो. ज्यामुळे तो बेजबाबदार आणि हिंसक वर्तन करु लागतो अशा वेळी पीडित जोडीदाराचे आयुष्य नरकमय बनते, असे निरिक्षण नोंदवत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (P&H High Court) अलीकडेच एका पुरुषाच्या घटस्फोटाच्या याचिकेला परवानगी दिली आहे.
पीडित पुरुषाने दाखल केलेल्या याचिकेवर ट्रायल कोर्टाने निरिक्षण नोंदवत दिलेला निकाल बाजूला सारत, न्यायमूर्ती रितू बाहरी आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, ट्रायल कोर्ट त्याच्या पत्नीच्या मानसिक आरोग्यावरील वैद्यकीय पुराव्याचे कौतुक करण्यात अपयशी ठरले.
कोर्टाने निरिक्षण नोंदवताना म्हटले की, दोन्ही डॉक्टर PW3 आणि PW5 यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जोडीदाराची (मानसिक स्थिती बिघडलेल्या) अवस्था ही उपचार करण्यायोग्य परंतू ती बरी होण्यासारखी नाही. अशा स्थितीत जोडीदाराचे आयुष्य हे नरक बनून जाईल. कारण से दिसून येते की हा मानसिक आजार/समस्या उत्तरदात्याला आयुष्यभर राहील आणि तिची सुटका होणार नाही. (हेही वाचा, High Court on Divorce Case: लाइफ पार्टनरवर अनैतिक संबंधाचा खोटा आरोप करणे देखील क्रूरता; घटस्फोटप्रकरणी महिलेला न्यायालयाने फटकारले)
न्यायालयाने पुढे निरिक्षण नोंदवले की, याचिकाकर्त्याने त्याच्या प्रदीर्घ अशा वैवाहीक आयुष्याच्या काळात उपचारांद्वारे समाधान शोधले. पण, हा असा आजार नाही की, ज्यावर उपचार केल्यानंतर, प्रतिवादी (मानसिक स्थिती ठिक नसलेला जोडीदार) बरा होईल. त्यामुळे याचिकाकर्त्या आणि त्याच्या विरुद्ध प्रतिवादीच्या अशा अतार्किक आणि अनुचित वर्तनाचा संपूर्ण वैवाहिक नातेसंबंधात कुटुंबातील सदस्य नक्कीच याचिकाकर्त्याला प्रचंड यातना आणि वेदना देत असतील.