Amit Shah, Rajnath Singh & Rahul Gandhi (Photo Credits: Facebook)

2 years of Pulwama Attack: दोन वर्षांपूर्वी जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी अजूनही सर्व भारतीयांच्या मनात ताज्या आहेत. 14 फेब्रुवारी रोजी 2019 रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला. त्यात तब्बल 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचे पडसाद केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर उमटले. विशेष म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी भारताने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला या हल्ल्याचे चोख उत्तर दिले, या सर्जिकल स्टाईकमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अड्डे उद्धवस्त करण्यात आले.

आज दोन वर्षपूर्ती निमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटच्या माध्यमातून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच भारत जवानांचा त्याग कधीच विसरणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Pulwama Terror Attack 2nd Anniversary: एका बाजूला व्हॅलेंटाईन दुसऱ्या बाजूला पुलवामा हल्ल्यातील शहीद सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली)

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ट्विट:

गृहमंत्री अमित शाह ट्विट:

राहुल गांधी ट्विट:

या हल्ल्यात IED चा वापर करण्यात आला होता. त्यानंतर अंधाधून गोळीबार करण्यात आला. दरम्यान, या हल्ल्यात शहीद जवानांचे स्मारक बांधण्यात आले आहे.