Pulwama Attack Site | (Photo Credits: PTI)

जगभरात आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) म्हणून साजरा होत आहे. जगभरातील लोक आजच्या दिवशी प्रेमाचे प्रतिक म्हणून गुलाबाची फुलं एकमेकांना देतात. पण, याच दिवशी भारतात गुलाबाची फुलं श्रद्धांजली म्हणूनही अर्पण केली जात आहेत. दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पूलवामा (Pulwama Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद (Tributes to CRPF Soldiers) झाले होते. तर इतर जखमी झाले होते. याच हल्ल्यातील शहीदांना शद्धांजली म्हणून आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शहिदांप्रती आदर व्यक्त केला जात आहे.

पुलवामा जिल्ह्यातील पुलवामा जिल्ह्यात जैश ए महोम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेला एक ट्रक घेऊन सीआरपीएफ जवानांच्या वाहनाला जोरदार धडक दिली होती. या घटनेत जोरदार स्फोट झाला यात सीआरपीएफ जवान मोठ्या प्रमाणावर ठार झाले. (हेही वाचा, पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती )

पूलवामा हल्ला घडवून आणणारे आदिल, कारी यासिर, सज्जाद भट्ट, उमर फारूक, मुदसिर अहमद खान हे सर्व दहशतवादी मारले गेले आहेत. यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) महत्त्वाची भूमिका बजावली. ऑगस्ट 2020 मध्ये पुलवामा हल्ला प्रकरणात एनआयएने सुमारे 13500 पानांचे आरोपपत्र दाखल केले. यात 19 आरोपींची नावे पुढे आली होती. यातील 6 जणांचा खात्मा करण्यात आला. हे सर्व 6 जण वेगवेगळ्या ठिकाणी मारले गेले.

एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले होते की, जैश ए मोहम्मद ने आयएसआयसह पुलवामा हल्ल्याचा कट रचला. चार्जशीटमध्ये 13 जण जिवंत आरोपी आहेत. यात सर्वात मोठे आरोपी जैशचा प्रमुख मौलाना मसूद अजहर आणि त्याचे दोन भाऊ रऊफ असगर मसूद आणि मौलाना अम्मार अली हे आहेत. या प्रकरणात पूरावे गोळा करण्यासाठी एनआयएने एफबीआयची मदद घेतली.