Anil Deshmukh's meet Sunil Kale family (PC- Twitter)

पुलवामा (Pulwama) येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे (Sunil Kale) यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत (Government Service) घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh's), सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांनी दिली. आज अनिल देशमुख, राजेश टोपे आणि दत्तात्रय भरणे यांनी पानगाव तालुका बार्शी येथे शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.

दरम्यान, यावेळी शहीद काळे यांची भाची वर्षा काळे यांनी कुटुंबाबाबत माहिती दिली. काळे कुटुंबीय जिरायती शेतीवर अवलंबून आहे. काळे कुटुंबियांना आधार देण्यासाठी कोणी नाही. त्यामुळे कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घेण्याची मागणी वर्षा काळे यांनी केली. यावर अनिल देशमुख यांनी शासन खंबीरपणे काळे कुटुंबाच्या पाठिशी आहे. वीर जवानाचा आम्हाला अभिमान असून काळे कुटुंबाला लागेल ती मदत शासन करेल, असेही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: राज ठाकरे यांचे निवासस्थान 'कृष्णकुंज'वर कोरोनाने पुन्हा दिली धडक, आणखी एक कामगार कोविड-19 संक्रमित)

राज्य सरकार काळे कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्याचा प्रयत्न शासन करेल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, असेही राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. यावेळी ‍शहीद जवान सुनील काळे यांच्या आई कुसुम काळे, पत्नी अर्चना, भाऊ नंदकुमार आणि किरण काळे उपस्थित होते.