PUBG गेमचे वेड ठरले जीवघेणे; सातत्याने 45 दिवस गेम खेळल्याने तेलंगणा येथे 20 वर्षीय मुलाचा मृत्यू
PUBG (Photo Credit: File Photo)

PUBG Addiction: पबजी मोबाईल गेममुळे होणाऱ्या दुर्घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तेलंगणा (Telangana) येथील 20 वर्षीय मुलाचा गेम खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, हा तरुण सातत्याने 45 दिवस पबजी गेम खेळत होता. त्यामुळे मानेचे गंभीर दुखणे उद्भवले आणि त्याला हैद्राबादमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. रिपोर्ट्सनुसार, सातत्याने गेम खेळल्याने त्याच्या मानेच्या नसेवर भयंकर ताण आला आणि त्याची नस पूर्णपणे डॅमेज झाली.

पबजी गेमची (PUBG Game) क्रेझ, व्यसन अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पजबी गेममुळे होणारा त्रास, दुष्परिणाम, गुन्हे, आत्महत्या अशा अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील एका विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या परीक्षेत उत्तरांऐवजी पबजी गेम कसा डाऊनलोड करावा आणि कसा खेळावा यासंबंधी माहिती लिहिली. पबजी गेमच्या वेडामुळे या हुशार विद्यार्थ्याला परीक्षेत नापास होण्याची वेळ आली. कर्नाटक: विद्यार्थ्याने परीक्षेत उत्तराऐवजी लिहिले, 'PUBG गेम डाऊनलोड करण्याची आणि खेळण्याची पद्धत'

पबजी गेमच्या या वाढत्या त्रासामुळे गेमवर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मात्र आतापर्यंत गुजरातमधील सुरत शहरात या गेमवर बंदी घालण्यात आली आहे.