पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत देशातील कोरोना (Coronavirus) स्थितीचा आढावा आज (22 डिसेंबर) घेतला. या बैठकीत पंतप्रधानांना सांगण्यात आले की, आपल्याकडे औषधे, लस आणि रुग्णालयातील खाटांच्या संदर्भात पुरेशी उपलब्धता आहे. तरीही पंतप्रधानांनी सल्ला दिला की, अत्यावश्यक औषधांची उपलब्धता आणि किमतींवर नियमितपणे लक्ष ठेवण्यात यावे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यात यावा शक्य त्या ठिकाणी नागरिकांनी एकमेकांमध्ये अंतर पाळावे.
पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीत सांगितले की, ऑक्सिजन सिलिंडर, PSA प्लांट्स, व्हेंटिलेटर आणि मानव संसाधनांसह रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांची परिचालन तयारी सुनिश्चित करण्यासाठी राज्यांना कोविड विशिष्ट सुविधांचे ऑडिट करावे. सर्व स्तरांवरील संपूर्ण कोविड पायाभूत सुविधा उपकरणे, प्रक्रिया आणि मानवी संसाधनांच्या बाबतीत युद्धपातळीवर तयार राहतील याची राज्यांनी खात्री करुन घेणे आवश्यक आहे. (हेही वाचा,COVID-19 Outbreak in China: चायनामुळे वाढले जगाचे टेन्शन; प्रतिदिन 5,000 पेक्षाही अधिक मृतांची बिंजिंगला नोंद- रिपोर्ट )
ट्विट
PM Modi advised States to audit Covid specific facilities to ensure operational readiness of Hospital Infrastructure, including oxygen cylinders, PSA plants, ventilators and human resources: Prime Minister's Office
— ANI (@ANI) December 22, 2022
पंतप्रधानांना या बैठकीत माहिती देण्यात आली की 22 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात सरासरी दैनंदिन प्रकरणे 153 पर्यंत आणि साप्ताहिक सकारात्मकता 0.14% पर्यंत घसरत आहे. भारतात कोविड संक्रमनात सातत्याने घट होत आहे. तथापि, पाठीमागील सहा आठवड्यांपासून जगभरात प्रतिदिन सरासरी 5.9 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत.