COVID-19 | (Photo Credits: ANI)

चीनमध्ये कोविड-19 (COVID-19) संक्रमित रुग्ण प्रतिदीन 5000 पेक्षाही अधिक संख्येने मृत्यूमुकखी पडत आहेत. हेल्थ डेटा फर्म एअरफिनिटीने वर्तवलेल्या अंदाजाच्या अधारे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या वृत्तात हा दावा करण्यात आला आहे. बींजिगमध्ये प्राप्त होत असलेल्या अधिकृत आकडेवारीत मोठ्या नाट्यमय रितीने घडामोडी घडत आहेत. युकेस्थीत एका संस्थेने म्हटले आहे की, की त्यांनी चायनातील कोरोना संक्रमितांच्या मृत्यूच्या आकडेवारीसाठी प्रादेशिक चीनी डेटावर आधारित मॉडेलिंगचा वापर केला आहे. ज्यामुळे चायनामध्ये सध्याचे दैनंदिन संक्रमण एक दशलक्षाहून जास्त असल्याचे निदर्शनास येते.

वृत्तसंस्थेने कोरोना स्थिती आणि कोविड संक्रमितांच्या ताज्या आकडेवारीबद्दल चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) कडे संपर्क साधला असता कोणताही विशेष प्रतिसाद मिळाला नाही. केवळ 21 डिसेंबर रोजी कोणतेही नवीन कोविड-19 मृत्यू झाले नाहित. फक्त लक्षणे असलेले 2,966 नवे संक्रमित आढळून आले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, चीनमध्ये कोविड संसर्गाचा आकडा नियंत्रीत राखण्यासाठी धडपडत आहे कारण त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.चीनने कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्याबाबत आगोदरच्या भूमिकेपासून अचानक यु-टर्न घेतला. चीन आता नव्याने होमाऱ्या संक्रमितांची आकडेवारी निटशी देत नाही. त्यातच चीनने सामूहिक चाचणी थांबविली आहे आणि लक्षणे नसलेल्या लोकांना रिपोर्ट दिला जात नाही. कमी लसीकरण झालेल्या लोकसंख्येमध्ये व्यापक संक्रमणामुळे जागतिक चिंता वाढली आहे.

ट्विट

Airfinity ने म्हटले आहे की चीनच्या सध्याच्या कोविड प्रादुर्भावात 1.3 ते 2.1 दशलक्ष लोक मरण पावू शकतात. इतर मॉडेलिंग गटांच्या विश्लेषणाने देखील 2.1 दशलक्ष मृत्यूंचा अंदाज लावला आहे. एअरफिनिटीचा अंदाज आहे की ज्या प्रदेशात सध्या प्रकरणे वाढत आहेत त्या प्रदेशात जानेवारीच्या मध्यवर दिवसाला 3.7 दशलक्ष आणि मार्चमध्ये दिवसाला 4.2 दशलक्ष असे दोन टप्पे दिसू शकतात. सध्या बीजिंग आणि दक्षिणेकडील ग्वांगडोंग प्रांतात प्रकरणे वेगाने वाढत आहेत, असे वृत्तात म्हटले आहे.