PM Narendra Modi (फोटो सौजन्य - ANI)

PM Modi Launches LIC Bima Sakhi Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज हरियाणातील पानिपतच्या दौऱ्यावर आहेत. आज येथे मोदींनी एलआयसीची ‘विमा सखी योजना’ (LIC Bima Sakhi Yojana) सुरू केली. विमा सखी योजनेचे उद्दिष्ट 10वी उत्तीर्ण झालेल्या 18-70 वयोगटातील महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. ‘विमा सखी योजने’ अंतर्गत, भारतभरातील एक लाख महिलांना एलआयसी एजंट म्हणून प्रशिक्षित केले जाईल. विमा सखी योजनेंतर्गत देशभरातील महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना पहिल्या वर्षी 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये मासिक स्टायपेंड मिळेल. यासोबतच आर्थिक साक्षरता आणि विमा जागृतीला चालना दिली जाईल.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोजी म्हणाले की, हरियाणातील दुहेरी इंजिन सरकार दुप्पट वेगाने काम करत आहे. आज भारत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक मजबूत पाऊल टाकत आहे. आजचा दिवस इतर कारणांसाठीही खास आहे. आज 9 तारीख आहे, 9 हा अंक शास्त्रात खूप शुभ मानला गेला आहे. 9 क्रमांक नवदुर्गेच्या नवीन शक्तींशी संबंधित आहे. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर रोजीच झाली. आज देश संविधानाची 75 वर्षे साजरी करत असताना 9 डिसेंबर ही तारीख आपल्याला समानता आणि विकास करण्याची प्रेरणा देते. (हेही वाचा - PM Modi Death Threat: पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांना आला मेसेज, तपास सुरू)

महिलांना विमा एजंट बनण्याची संधी -

देशातील बहिणी आणि मुलींना रोजगार देण्यासाठी येथे (पानिपत) 'विमा सखी योजना' सुरू करण्यात आली आहे. मी देशातील सर्व भगिनींचे खूप खूप अभिनंदन करतो. काही वर्षांपूर्वी मला पानिपत येथून 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' मोहिमेची सुरुवात करण्याचे सौभाग्य मिळाले होते. त्याचा सकारात्मक परिणाम हरियाणासह संपूर्ण देशात जाणवला. आता 10 वर्षांनंतर पानिपतच्या या भूमीतून बहिणी आणि मुलींसाठी 'विमा सखी योजना' सुरू करण्यात आली आहे. आपले पानिपत हे स्त्रीशक्तीचे प्रतीक बनले आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केलं. (हेही वाचा -Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन)

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार विमा सखी योजना -

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी भरपूर संधी मिळणे आणि त्यांच्या समोरील प्रत्येक अडथळे दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांना जेव्हा पुढे जाण्याची संधी मिळते, तेव्हा त्या देशासाठी संधींचे नवे दरवाजे उघडतात. आमचे भाजप सरकार मुलींवरील प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे. स्वातंत्र्याच्या 60-65 वर्षांनंतरही, बहुतेक महिलांची बँक खाती नव्हती, याचा अर्थ महिला बँकिंग सुविधांपासून दूर होत्या. त्यामुळे आमच्या सरकारने सर्वप्रथम माता-भगिनींची जन धन खाती उघडली. आज मला अभिमान आहे की जन धन योजनेअंतर्गत 30 कोटींहून अधिक महिलांची खाती उघडण्यात आली आहेत.

10 कोटी बहिणी बचत गटात सामील -

आज लाखो मुलींना विमा सखी बनवण्याची मोहीम सुरू केली जात आहे. ज्या सेवेपासून त्या एकेकाळी वंचित होत्या, आज त्यांनाच या सेवेशी इतर लोकांना जोडण्याची जबाबदारी दिली जात आहे. आज देशभरातील 10 कोटी भगिनी बचत गटांशी निगडित आहेत. गेल्या 10 वर्षात आम्ही बचत गटांच्या महिलांना 8 लाख कोटी रुपयांहून अधिक मदत केली आहे. देशभरातील बचतगटांतील भगिनींची भूमिका विलक्षण आहे. त्यांचे योगदान मोठे आहे, असंही यावेळी पंतप्रधानांनी नमूद केलं.