PM Modi Death Threat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) शनिवारी व्हॉट्सॲपवर संदेश मिळाला. संदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज अजमेर, राजस्थान येथून पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. मेसेज पाठवणाऱ्या संशयिताच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक अजमेरला रवाना करण्यात आले आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर काही तासांपूर्वी हा संदेश पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या संदेशात अज्ञान व्यक्तीने म्हटलं आहे की, दोन आयएसआय एजंट आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी बॉम्बस्फोटाची योजना आखण्यात आली आहे. मेसेज पाठवणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा त्याने दारूच्या नशेत हा संदेश पाठवला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर यापूर्वीही असे धमकीचे संदेश आले आहेत. (हेही वाचा -Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन)
यापूर्वी पंतप्रधानांना देण्यात आली होती जीवे मारण्याची धमकी -
यापूर्वी 27 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून पंतप्रधान मोदींना इजा करण्याची धमकी देण्यात आली होती. पश्चिम उपनगरातील आंबोली येथून हा कॉल ट्रेस करण्यात आला. त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या पथकाने महिला कॉलरचा शोध घेतला आणि तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासाअंती ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे आढळून आले आणि हा कॉल 'प्रँक' असल्याचे निष्पन्न झाले. (हेही वाचा - Yogi Adityanath यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मुंबईत 24 वर्षीय तरूणीला अटक)
सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी -
दरम्यान, 7 नोव्हेंबर रोजी मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइनवर लारेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करत संदेश पाठवण्यात आला होता. या संदेशात सलमान खानने 5 कोटी रुपये न दिल्यास त्याची हत्या केली जाईल, असा इशारा देण्यात आला होता. तथापी, पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतले होते.