जागतिक महामारी कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव सध्या भारतात थोडासा मंदावला असला तरी, जगाची या आजारापासून पूर्णपणे सुटका झालेली नाही. लोक कोविडमधून बरे होत आहेत, परंतु या संसर्गानंतर लगेचच ते त्याच्याशी संबंधित इतर गुंतागुंतांच्या (आरोग्यविषयक इतर समस्या) आजारांच्या विळख्यात अडकत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे, बर्याच प्रकरणांमध्ये लोकांना कोरोना होण्यापूर्वी अशा गुंतागुंतांची समस्या कधीच आल्या नव्हत्या.
जसा जसा काळ पुढे सरकार आहे, तस तसे तो उत्परिवर्तनासह त्याचे स्वरूप, मूड आणि रंग बदलत आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) च्या न्यूरोलॉजी विभागाच्या प्रमुख प्राध्यापक पी. श्रीवास्तव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘कोरोनानंतर मेंदूमध्ये गुंतागुंत (काही शारीरिक समस्या) निर्माण होऊ शकतात. मेंदूचा झटका येऊ शकतो. धमन्या किंवा शिरामध्ये स्ट्रोक येतो आणि त्यामुळे मेंदूला सूज येण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते.’
It's true that people with severe Covid have worse one-year outcomes, but even those with mild Covid can get increased incidents of heart attacks...We ask all Covid patients to not ignore symptoms & get themselves checked: Dr A Seth, Chairman,Fortis Escorts Heart Institute, Delhi pic.twitter.com/llpq3xrz36
— ANI (@ANI) September 5, 2022
मात्र, या विषयावर सध्या संशोधन सुरू असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या. सध्या डॉ ए सेठ, अध्यक्ष, फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट, दिल्ली यांनी सांगितले की, ‘गंभीर कोविड असलेल्या लोकांना वर्षभर वाईट परिणाम दिसू शकतात, परंतु सौम्य कोविड असलेल्यांना देखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आम्ही सर्व कोविड रूग्णांना लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि स्वतःची तपासणी करून घेण्यास सांगत आहतो.’ (हेही वाचा: जगातील पहिली फक्त वास घेऊन कोरोनाला प्रतिबंध करणारी लस; चीनने दिली आपत्कालीन वापरासाठी मान्यता)
Post-Covid, there can be a development of complications...in brain, there are immediate acute situations like brain attack or stroke in arteries/veins, brain inflammation... research underway... no black & white picture yet: Prof P Srivastava, Head Deptt of Neurology, AIIMS Delhi pic.twitter.com/cC8Gzz1aGA
— ANI (@ANI) September 5, 2022
दरम्यान, 24 तासांत भारतात कोरोनाचे 5,910 नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्राने सोमवारी (5 सप्टेंबर 2022) सकाळी ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण संक्रमित लोकांची संख्या 4,44,62,445 झाली आहे, तर मृतांचा आकडा 5,28,007 वर गेला आहे. सध्या भारतात कोरोना विषाणूवर उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या 53,974 वर आली आहे.