Close
Search

PM Modi Address to Nation Highlights: 'युद्ध सुरू आहे तोपर्यंत शस्त्र खाली ठेवू नका'; 100 कोटी लसींचा टप्पा पार झाला तरीही कोविड नियमावली पाळण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन

भारताचा संपूर्ण लसीकरण कार्यक्रम विज्ञानावर आधारित असल्याने त्याचा अभिमान असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

बातम्या टीम लेटेस्टली|

PM Narendra Modi | (Photo Credits-Twitter/ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित करताना कोविड 19 लसीकरणाच्या 100 कोटींचा टप्पा पार करण्याच्या अभुतपूर्व कामगिरी बाबत कौतुक करताना नागरिकांनी 'मास्क' घालणं आता नित्याचं करा असं आवाहन केले आहे. 'युद्ध सुरू आहे तोपर्यंत शस्त्र खाली ठेवू नका.' असं आवाहन करताना त्यांनी येत्या काळात कोविड नियमावलीचं पालन करण्याचेही म्हटलं आहे. नक्की वाचा: COVID 19 Vaccination In India: भारतात एकूण कोविड 19 च्या लसींचा 100 कोटींंचा टप्पा पार; देशभरात सेलिब्रेशन.

भारताचा संपूर्ण लसीकरण कार्यक्रम विज्ञानाच्या कुशीत जन्माला आला आहे. वैज्ञानिक आधारांवर तयार झाला आहे. शास्त्रीय पद्धतीनेच सगळीकडे पोहोचला आहे. भारताचा संपूर्ण लसीकरण कार्यक्रम विज्ञानावर आधारित असल्याने त्याचा अभिमान असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नवा भारत नव्या आव्हानांना पेलण्यासाठी सज्ज आहे. त्याचं दर्शन जगाला घडलं आहे. यावेळी लसीकरण मोहिमेत कोणताही भेदभाव न करता विक्रमी लसीकरण करून दाखवलं. त्यामध्ये श्रीमंत लोकांना कोणतीही विशेष ट्रीटमेंट दिली नसल्याचं म्हटलं आहे. को विन अ‍ॅप चं देखील कौतुक होत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. कोविड लसींच्या बाबतही लोकांना इतक्यांचं लसीकरण कसं होणार? कधी होणार? असा प्रश्न होता पण आता सार्‍यांना त्यांची उत्तर दिली आहे. 'व्होकल फॉर लोकल' चा नारा देखील आता लसीकरणामध्ये पुढे आला आहे. लसीकरणामध्ये ज्यांनी अद्याप सहभाग घेतला नाही त्यांना लस घेतलेल्यांनी प्रेरणा द्यावी असं आवाहनही मोदींनी केले आहे. जसे

स्वच्छ भारत अभियान एक जनचळवळ आहे, तसेच भारतात तयार झालेल्या वस्तू खरेदी करणं, भारतीयांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करणं, Vocal For Local

स्वच्छ भारत अभियान एक जनचळवळ आहे, तसेच भारतात तयार झालेल्या वस्तू खरेदी करणं, भारतीयांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करणं, Vocal For Local असणं, हे सगळं आपल्याला प्रत्यक्ष आचरणात आणावं लागेल.

मागच्या वर्षी दिवाळी मध्ये लोकांच्या मनात भीतीचं वातावरण होते तर आता कोविड 19 लसीकरणामुळे लोकांना यंदाच्या दिवाळी सुरक्षित वातावरणामध्ये साजरी करता येणार आहे. आजच्या केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत कोरोनाचे आणखी 15,786 नवे रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 231 जणांचा बळी गेला आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change