भारतामध्ये कोविड 19 विरूद्ध जगातील सर्वात मोठे व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह (World's Biggest Vaccination Drive) लॉन्च केल्यानंतर आज 9 महिन्यांनंतर एकूण कोविड 19 लसींचा 100 कोटींचा टप्पा पार पाडण्यात देशाला यश मिळालं आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीचा टप्पा सेलिब्रेट करण्यासाठी सरकार कडून विविध कार्यक्रमांची तयारी आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सकाळी दिल्लीत राम मनोहर लोहिया रूग्णालयाला भेट दिली तसे आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण मोहिमेत सहभागी सार्यांचे आभार मानले, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील मिठाई वाटून सेलिब्रेशन सुरू केले आहे.
कोविड 19 लसीच्या 100 कोटी टप्प्याच्या काही खास गोष्टी
- कोविन अॅपच्या माहितीनुसार भारतामध्ये आज एकूण कोविड 19 लसींचा टप्पा 100 कोटींच्या पार गेला आहे.त्यामध्ये 70,83,88,485जणांना पहिला डोस तर 29,18,32,226 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सध्या देशात 74,583 व्हॅक्सिनेशन सेंटर असून 72,396 सरकारी आणि 2,187 खाजगी केंद्र आहेत.
- भारतात कोविड 19 लसीचा 100 कोटीचा टप्पा पूर्ण झाल्याने कैलाश खेर यांच्या आवाजातील खास ऑडिओ-व्हिडिओ फिल्म दिल्लीत लाल किल्ल्यावर प्रदर्शित केली जाणार आहे. तसेच 1400 किलो वजनाचा मोठा राष्ट्रध्वज देखील फडकवला जाणार आहे. COVID-19 Vaccination Anthem Song: देशातील लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी कैलाश खेर यांनी सादर केले खास गीत (Watch Video) .
- आज भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीची घोषणा ट्रेन, शिप, फ्लाईटस मध्ये लाऊड स्पीकर द्वारा देखील केली जाणार आहे. देशभरातल्या 100 स्मारकांवर रोषणाई देखील करण्यात आली आहे. नक्की वाचा: भारतात कोविड लसीकरण मोहीम 100 कोटींचा टप्पा गाठत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आगाखान पॅलेस वर खास विद्युत रोषणाई Watch Video .
- भारता व्यतिरिक्त केवळ चीन मध्ये कोविड 19 लसीच्या लसीकरणामध्ये 100 कोटींचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. चीन मध्ये जून महिन्यात 100 कोटींचा टप्पा पार झाला आहे.
BKC COVID HOSPITAL मधील सेलिब्रेशन
#100crorevaccination #BkcVaccination
Congratulations India pic.twitter.com/b72vPWYMuy
— BKC COVID HOSPITAL (@bkchospital) October 21, 2021
आतापर्यंत भारतात 18 वर्षांवरील 75% टक्के लोकांना कोविड 19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 31 टक्क्यांहून अधिक लोकं पूर्ण लसवंत आहेत. देशात 18-44 वयोगटातील 55,29,44,021 आणि 45-59 वयोगटातील 26,87,65,110 आणि 60 वर्षांवरील 1,69,82,430 जणांचे लसीकरण झाले आहे.