Ganesh Murti And Prakash Javadekar (Photo Credits: PTI and Pixabay)

काही दिवसांपूर्वी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (Central Pollution Control Board) प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (Plaster of Paris) मूर्ती आणि त्यांच्या उंचीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र अनेकांनी यंदा पीओपीच्या मूर्तींच्या ऑर्डर आधीच दिल्या आहेत. त्यातच यावेळी आलेले कोरोनाचे संकट, त्यामुळे मुर्तीकारांना मिळालेला अपुरा वेळ व अडचणीत आलेली अर्थव्यवस्था या सगळ्याचा विचार करता केवळ या वर्षासाठी पीओपीच्या मूर्तींवर घातलेली बंदी शिथिल करावी, अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्याकडे केली होती. या सर्वांचा साराचार विचार करता पीओपीच्या गणेशमूर्तींवरील बंदीचा निर्णय 1 वर्षासाठी स्थगित करण्यात आला आहे अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

देशभरात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पेण हे गणपतीचे गाव म्हणून ओळखले जाते. पेण येथील हमरापूर, कळवे, दादर यासारंखी अनेक छोट्या गावात गणपतींच्या मूर्ती तयार केल्या जातात. परंतु, कमी किमतीत आणि वजनाला हलके असल्याने मूर्ती घडवण्यासाठी पीओपीचा सर्रास वापर केला जातो. मात्र, पीओपीचा वापर केल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत असून जल प्रदूषणाचे प्रमाणात वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे केंद्रीय प्रदुषण मंडळाने पीओपीपासून तयार केलेले मूर्तींवर निर्बंध लावले होते. मात्र यंदा आलेले कोरोनाचे संकट लक्षात घेता हा निर्णय 1 वर्षांसाठी स्थगित करण्यात आला आहे. पीओपीपासून तयार करण्यात येणाऱ्या गणेश आणि दुर्गा मूर्तीवर निर्बंध; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मूर्तिकारांना सूचना

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याचा फटका सर्वांनाच बसला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रसह संपूर्ण देशात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहेत. कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे.