Wholesale Fuel Prices & Inflation: पेट्रोल-डिझेल घाऊक महागाई दरात मे महिन्यात 12.94% वाढ
Fuel Prices | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

देशातील इंधन दरांच्या घाऊक किमतींच्या महागाई दरात ( Wholesale Fuel Prices & Inflation) मे (2021) महिन्यात मोठी वाढ पाहण्यात आली. कच्चे तेल (Crude Oil) उत्पन्न आणि प्रक्रियेवरील लागत मुल्य वाढल्यामुळे घाऊक इंधन दराच्या किमती वाढत गेल्या. मे महिन्यात या किमत 12.94% इतक्या उच्चांकी पातळीवर वाढल्या. WPI चलनवाढीचा मे 2020 मधिल दर हा (-) 3.37% इतका होता. त्यात तुलनेत मे 2021 मध्ये WPI महागाई दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. घाऊक किंमत निर्देशांक (WPI) आधारित महागाई निर्देशांकातील वाढीचा हा सलग पाचवा महिना आहे.

एप्रिल 2021 मध्ये डब्ल्युपीआय चलनवाढीचा दर हा जवळपास दुहेरी आकड्यांवर म्हणजे 10.49% वर पोहोचला होता. मासिक डब्ल्यूपीआय वर आधारित महागाईचा वार्षिक दर मे 2021 मध्ये (-) 37.3737% इतका होता. त्या तुलनेत मे 2021 च्या मे महिन्यात (मे 2021 पर्यंत) 12.94% इतका होता. (हेेही वाचा, Gold Silver Price Today: सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी दर कसे आहेत? घ्या जाणून)

मे 2021 मध्ये इंधन महागाईचा वाढलेला दर हा प्रामुख्याने कच्चे पेट्रोलियम, खनिज तेलांच्या (उदा. पेट्रोल, डिझेल, नाफ्था, फर्नेस तेल) उत्पादित वस्तूंच्या किमतीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याने झाला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ही माहिती दिली.

इंधन आणि उर्जा क्षेत्रातील वाढीचा उच्चांक मे महिन्यादरम्यान 37.61% इतका राहिला. एप्लिल महिन्यात हाच दर 20.94% इतका होता. उत्पादित उत्पादनांमध्ये चलनवाढीचा दर मे महिन्यात 10.83% होता. तर मागील महिन्यात तो 9.01% होता. तथापि, कांद्याच्या किमतींमध्ये वाढ झाली असतानाच अन्नधान्य वस्तूंच्या महागाईचा दर मेमध्ये किंचित घसरून 4.31 टक्क्यांवर आला. कांद्याची महागाई मे महिन्यात (-) 23.24 टक्के होती. एप्रिल महिन्यात (-) 19.72% इतकी होती.