Gold Silver Price Today: सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी दर कसे आहेत? घ्या जाणून
Gold Silver Price | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सोने-चांदी दरात (Gold Silver Rate) चढ उतार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात सोने दर (Gold Rate) काहीसे उतरल्याचे पाहायला मिळाले होते. गेल्या आठवड्यात शेवटच्या टप्प्यात सोने दराने उसळी मारल्याचे पाहायल मिळाले होते. चांदी (Silver Rate) दरातही 1100 रुपयांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोने 441 रुपयांसह प्रति दहा ग्रॅम 48,530 रुपये इतक्या दराने विकले जात आहे. Good Returns वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सोमवारी सोने दरात अल्पसा बदल झाल्याचे पाहायला मिळते.

दरम्यान, चांदी दराबाबत बोलायचे तर गेल्या आठवड्यात शेवटचा व्यवहार झाला तेव्हा चांदीसुद्धा 1,148 रुपयांनी वधारुन 71,432 रुपये प्रति किलोग्राम इतक्या उंचीवर पोहोचली होती. त्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात किरकोळ घसरण पाहायला मिळत होती. त्या दिवशी सोने 1,896 डॉलर प्रति औंस दराने विकले जात होते. तर, चांदी 28.15 डॉलर प्रति औंस इतक्या दरावर स्थिर होती.

दरम्यान, सोने चांदी दरा राष्ट्रीय पातळीवर शहरानुसार विविधता आढळून येते. आजही सोन्याच्या भावात देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये किंमतींमध्ये निरनिराळी वाढ दिसून आली. जर देशभरातील ग्राहक जर सोने सोमवारी (14 जून) खालील शहरांमध्ये विकत घेण्याच्या विचारात असतील तर जाणून घ्या ही खरेदी तुम्हाला किती रुपयांना पडू शकेल? (हेही वाचा, El Salvador ठरला Bitcoin ला औपचारिक मान्यता देणारा जगातील पहिला देश; लवकरच चलनात होणार वापर )

देशभरातील प्रमुख शहरांमधील सोने चादी दर

देशभरातील प्रमुख शहरांमधील सोने चादी दर (*दर रुयपांमध्ये प्रति 10 ग्रॅमनुसार, आकडेवारी Good Returns)
शहर 22 कॅरेट गोल्ड रेट 24 कॅरेट गोल्ड रेट
चेन्नई 45,750 रुपये 49,900 रुपये
मुंबई 47,720 रुपये 48,720 रुपये
दिल्ली 47,880 रुपये 52,180 रुपये
कोलकाता 48,480 रुपये 51,180 रुपये
बंगळुरु 45,500 रुपये 49,640 रुपये
हैदराबाद 45,500 रुपये 49,640 रुपये
केरळा 45,500 रुपये 49,640 रुपये
पुणे 47,720 रुपये 48,720 रुपये
वडोदरा 48,230 रुपये 50,230 रुपये

सोने दरात स्थानिक ते आंतरराष्ट्रीय अशा अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. प्रामुख्यने इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन सोने दर ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन प्रामुख्याने मुंबईतील सोने दर ठरवते. यात स्थानिक आयात कर MCX कमोडिटी मार्केट अशा गोष्टींचा विचार अंतर्भूत असतो.त्यातूनच सोने दर ठरतो.