Petrol - Diesel Price | Image Use For Representational Purpose | File Photo

देशात सलग पाचव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवार, 9 फेब्रुवारीपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजही ही वाढ कायम असून मुंबईत पेट्रोल 94.93 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर प्रति लिटर 85.70 रुपये इतका झाला आहे. मुंबईत पेट्रोल ची किंमत 95 रुपयांच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत आणखी वाढ झाल्यास पेट्रोलची किंमत 100 रुपयांचा आकडा गाठेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दिल्लीत पेट्रोलची किंमत 88.44 रुपये तर डिझेल 78.74 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. कोलकाता म्ध्ये 89.73 रुपये पेट्रोल तर 81.96 रुपये डिझेल असे दर आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल 90.70 रुपये आणि डिझेल 83.52 रुपयांनी विकले जात आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर अधिक आहेत. (पहा कालचे दर किती होते)

पहा महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल डिझेलच्या किंमती:

शहरं

पेट्रोल दर

डिझेल दर

मुंबई रु.  94.93 रु. 85.70
दिल्ली रु. 88.44  रु. 78.74
चेन्नई रु. 90.70 रु. 83.52
कोलकाता रु.  89.73 रु. 81.96
बंगळुरु रु.  91.40 रु. 83.47
हैद्राबाद रु.  91.96 रु. 85.89
जयपूर रु.  94.86 रु. 87.04

पेट्रोल डिझेलच्या हळूहळू वाढत जाणाऱ्या किंमती 90 रुपयांच्या पार गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. दरम्यान, आखाती देशांमधून इंधन आयात केले जाते. त्यावेळेस त्यावर इम्पोर्ट ड्युटी लागते. यावरुन इंधनाची प्रति बॅरल किंमत ठरते. त्यानंतर हे क्रुड ऑईल रिफायनरीज मध्ये जातं. त्यावर प्रोसेस होऊन त्याचे बायप्रॉडक्ट्स तयार केले जातात. या बायप्रॉडक्ट्सवर म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसिन, सीएनजी यावर कंपन्या केंद्र सरकारला एक्ससाईज ड्युटी देतात. त्यानंतर त्यावर राज्यांचे कर लागू होतात. पुढे पेट्रोल पंपावर त्यावर रिटेलरचं कमिशन अॅड होतं आणि मग  इंधनाची किंमत ठरते.