Dharmendra Pradhan | (Photo Credits: ANI)

इंधन दरवाढीच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री (Union Petroleum Minister) धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी तसे संकेत दिले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर (Diesel prcie) खाली येतील असे धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतान धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेली माहिती जर प्रत्यक्षात आली तर देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय पातळीर खनिज तेलांचे दर घरसले. घसरलेल्या या दरांचा फायदा लोकांपर्यंत पोहोचिण्यासाठी आम्ही त्या वेळी प्रयत्न सुरु केले होते. त्याचा फायदा आता दिसू लागला आहे. येत्या काही काळात याचे आणखी दृश्य परिणाम दिसू लागतील. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती आणखी खाली उतरताना दिसू लागती, असा दावा धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.

त्यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे (LPG) दर आता कमी व्हायला सुरुवात होईल. आगामी काही दिवसांमध्ये ते दिसून येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर घसरल्यानंतर आम्ही त्याचा फायदा सामान्य ग्राहकांपर्यंत हस्तांतरित करायला सुरुवात केली होती. त्याचे परिणाम आता दिसून येतील, असा दावा धर्मेंद्र प्रधान यांनी केला. त्यामुळे कोरोना संकटामुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्य लोकांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Satara: इंधनाचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर अन् साताऱ्यातील विहिरींमध्ये पाण्याऐवजी पेट्रोल)

गेल्या काही काळापासून देशभरातील इंधन दर गगनाला भिडू पाहात आहेत. परंतू, आज सलग पाचवा दिवस आहे. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवरुन उपलब्द झालेल्या माहितीनुसार हे दर न बदलण्याचा निर्णय झाल्याचे समजते.

आजचे पेट्रोल डिझेल दर (प्रती लिटर)

दिल्ली

पेट्रोल- 90.56 रुपये

डिझेल- 80.87 रुपये

मुंबई

पेट्रोल- 96.98 रुपये

डिझेल- 87.96 रुपये

वरील दर हे इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवरुन प्राप्त झाले आहेत. या आधी पाठिमागील 10 दिवसांमध्ये इंधन कंपन्यांनी इंधन दरात 3 वेळा कमी कपात करण्यात आली आहे. परंतू, ही कपात अगदीच काही पैशांत वैगेरे होती.