Pegasus Snooping Controversy: राहुल गांधी यांची विरोधकांसोबत ब्रेकफास्‍ट मीटिंग; सत्ताधाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रणनितीसाठी बैठक
Narendra Modi, Rahul Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सलग दोन आठवडे झाले तरी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) दोन्ही सभागृहातील कामकाज मिळून 18 तासांच्या पुढे सरखू शकले नाही. पेगसॅस प्रकरणावरुन विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी केली आहे. या प्रकरणावरुन निर्माण झालेला तीडा कसा सोडवायचा. विरोधकांना कसे प्रत्युत्तर द्यायचे यासाठी सत्ताधारी भाजपच्या संसदीय समितीची एक बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आज (मंगळवार, 3 ऑगस्ट) पार पडली. दुसऱ्या बाजूला पेगॅसस मुद्द्यावरुन चर्चा टाळू पाहणाऱ्या मोदी सरकारला अधिक धारेवर धरण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज ब्रेकफास्ट मीटिंगचे आयोजन केले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये या दोन्ही बैठकांचे पडसात उमटताना दिसत आहेत.

कृषी कायदे आणि पेगॅसस प्रकरणावरुन सातत्याने संसदेचे कामकाज ठप्प पाडले जात आहे. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संताप व्यक्त केला. विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी म्हटले की, विरोधी पक्ष सतत्याने संसदेचे कामकाज बंद पाडत आहे. हा संसद, घटना आणि देशातील जनतेचा अपमान आहे. या आधी पंतप्रधान मोदी यांनी 27 जुलै रोजी बोलावलेल्या भाजपच्या संसदीय पक्षांच्या बैठकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार निशाणा साधला होता. त्यावेळीही पंतप्रधान मोदी यांनी आरोप केला होता की, विरोधक संभागृह चालू देत नाही. (हेही वाचा, Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन आठवड्यात केवळ 18 तास कामकाज, जनतेच्या पैशाचा चुराडा)

राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये पेगसास प्रकरणावरुन रणनिती ठरविण्यात आली. या बैठकीला काँग्रेस, एनसीपी, शिवसेना, राष्‍ट्रीय जनता दल, आरएसपी, केसीएम, समाजवादी पार्टी, माकपा, भाकपा, आईयूएमएल, जेएमएम, नेशनल कांफ्रेंस, तृणमूल कांग्रेस आणि एलजेडी आदी पक्ष सहभागी झाले होते. दरम्यान, या बैठकीसाठी आम आदमी पक्ष उपस्थित नव्हता. मात्र, आप नेता संज सिंह यांनी सांगितले की, बैठकीला उपस्थित असणे किंवा नसणे हे महत्त्वाचे नाही. तर जेव्हाही सभागृहात कृषी कायद्याबाबत आणि पेगसास प्रकरणावर चर्चा होईल, तेव्हा आम्ही त्या चर्चेत सहभागी होऊ.