Passenger Finds Fungus-infested Yoghurt: वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला जेवणात बुरशीयुक्त दही मिळाले आहे. प्रवासी हर्षद टोपकर यांना हा अनुभव आला. जो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. प्रवाशाची तक्रार आणि घटना कळताच रेल्वे अधिकारी आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) कडून त्वरित प्रतिसाद देण्यात आला. आयआरसीटीसीने प्रवाशाची माफी मागितली आणि घडल्या प्रकाराबद्द दिलगीरी व्यक्त केली. दरम्यान, वंदे भारतमध्ये प्रवाशांकडून जेवणाच्या तक्रारी वाढल्याचे वांरवार पुढे आले आहे.
बुरशीयुक्त दही पाहून प्रवाशाला धक्का
प्रवासी हर्षद टोपकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ते वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांनी जेवण ऑर्डर केले. जे आयआरसीटीसीद्वारे पुरवले जाते. जेव्हा निश्चीत वेळेमध्ये जेवण आले तेव्हा पाहायला मिळाले की, जेवणाचा भाग म्हणून दिल्या जाणाऱ्या दह्यात बुरशी आढळून आली. बुरशीयुक्त दही पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी सोशल मीडियावर आलेला अनुभव आणि रेल्वे व्यवस्थापनाकडून जेवणाबाबत झालेली निराशा सामायिक केली. टोपकर यांनी आलेला अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून वंदे भारत सेवा मानकांबद्दल निराशा व्यक्त करत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केले. (हेही वाचा, Cockroach Found in The Meal of Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेनमध्ये जेवणात आढळले झुरळ, आयआरसीटीसीने मागीतली माफी (See Pics)
IRCTC द्वारे तत्काळ प्रतिसाद
दरम्यान, हर्षद टोपकर यांची पोस्ट पाहून रेल्वेसेवा आणि उत्तर रेल्वे सेवेकडून तत्काळ प्रतिसाद आला. रेल्वे सेवेने टोपकर यांच्या प्रवासाच्या तपशिलांची विनंती केली, तर उत्तर रेल्वेने पुढील कारवाईसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ला टॅग केले. IRCTC ने त्वरीत या घटनेला तातडीने प्रतिसाद दिला आणि प्रवाशासोबद घडलेली घटना आणि त्याला आलेल्या अनुभवाबद्दल माफी मागितली. आयआरसीटीसीने आश्वासन दिले की ऑनबोर्ड पर्यवेक्षकाने सूचनेनुसार दही त्वरित बदलले आणि पॅक त्याच्या एक्सपायरी तारखेच्या आत असल्याची पुष्टी केली. IRCTC ने भविष्यातील घटना टाळण्यासाठी निर्मात्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याचे वचन दिले आहे. (हेही वाचा, Mumbai-Jalna Vande Bharat Express; भारतीय रेल्वे लवकरच सुरु करणार मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस; जाणून घ्या सविस्तर)
एक्स पोस्ट
@RailMinIndia @RailwayNorthern @AshwiniVaishnaw
traveling to Vande Bharat from Dehradun to Anad vihar in the executive class today. Found greenish layer most probably fungus in the amul yogurt served. This is not expected from the Vande Bharat service pic.twitter.com/ScwR1C0rlz
— Harshad Topkar (@hatopkar) March 5, 2024
टोपकर यांना आलेला अनुभव वंदे भारत एक्स्प्रेसमधील प्रवाशांना वारंवार भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकते. गेल्या महिन्यात अशाच एका घटनेत, राणी कमलापती ते जबलपूर जंक्शनला जाणाऱ्या एका प्रवाशाला 1 फेब्रुवारी रोजी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये IRCTC ने दिलेल्या जेवणात मेलेले झुरळ दिसले. प्रवाशांनी अशा त्रुटींबद्दल सतत चिंता व्यक्त केल्यामुळे, रेल्वे अधिकारी आणि IRCTC यांनी प्रवाशांचे समाधान आणि सुरक्षितता मानके राखण्यासाठी कडक गुणवत्ता नियंत्रण उपायांना प्राधान्य दिले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.