पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा, 14 ऑगस्ट Partition Horrors Remembrance Day म्हणून साजरा केला जाणार
PM Narendra Modi (Photo Credits-File Image)

Partition Horrors Remembrance Day: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (14 ऑगस्ट) एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता प्रत्येक वर्षी 14 ऑगस्ट हा 'फाळणी वेदना दिन' म्हणून साजरा केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ट्विट करत असे म्हटले की, देशाच्या विभाजनाचे दु:ख कधीच विसरता येणार नाही. द्वेश आणि हिंसेच्या कारणामुळे आपल्या लाखो भावा-बहिणींनींना विस्थापित व्हावे लागलेच पण आपला जीव सुद्धा त्यांना गमवावा लागला. त्या लोकांचे संघर्ष आणि बलिदान लक्षात ठेवता 14 ऑगस्ट हा 'फाळणी वेदना दिन' म्हणून साजरा केला जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या ट्विट मध्ये असे म्हटले की, फाळणी वेदना दिन हा आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि दुर्भावना नष्ट करणअयाच्या उद्देशाने प्रेरित करणार आहे. त्याचसोबत एकता, सामाजिक सद्भाव आणि मानवीय संवेदना सुद्धा मजबूत करण्यास मदत होणार आहे.(75th Independence Day 2021: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एकूण 1,380 भारतीय वीरांचा सरकारकडून होणार सन्मान, जाणून घ्या नक्की कोणाला मिळणार पुरस्कार ?)

Tweet:

मोदी रविवारी 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित करणार आहेत. भारताचे ऑलंम्पिंक दल 15 ऑगस्टला विशेष पाहुणे म्हणून लाल किल्ल्यावर उपस्थिती लावणार आहेत. 75 वा स्वातंत्र्य दिन हा आजादी का अमृतमोहत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिवोवर लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देशाला संबोधित करणार आहेत. रामनाथ कोविंद यांच्या संबोधनाचे प्रक्षेपण हे आकाशवाणीच्या सर्व स्टेशनवर आणि दूरदर्शनच्या सर्व चॅनलवर उपलब्ध असणार आहे. हे हिंदी आणि इंग्रजी भाषेत ही प्रसारित केले जाणार आहे.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीसह काही शहरात जोरदार तयारी सुरु आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर शुक्रवारी इंडिपेंडस डे परेडची फुल-ड्रेस रिहर्सल करण्यात आली. आगरा येथे 75 पॅराट्रुपर्सच्या पॅरा ब्रिगेड पर्सनल यांनी शुक्रवारी फ्री फॉलचे प्रदर्शन केले. तर प्रत्येक वर्षीप्रमाणे लाल किल्ला आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसर, बॉर्डरचा परिसर आणि दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे.