Pakistani Terrorist: दिल्लीमध्ये संशयित पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक; AK-47, ग्रेनेड आणि बनावट पासपोर्टही जप्त
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

देशाची राजधानी दिल्लीतून (Delhi) एका पाकिस्तानी दहशतवाद्याला (Pakistani Terrorist) अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने पाकिस्तानी नागरिकत्वाच्या एका दहशतवाद्याला लक्ष्मी नगरमधील रमेश पार्कमधून अटक केली आहे. असे सांगितले जात आहे की, हा दहशतवादी भारतीय नागरिकत्वाच्या बनावट ओळखपत्रासह राहत होता. सध्या या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. माहिती मिळाली आहे की, या पाकिस्तानी दहशतवाद्याकडून एके-47 रायफलसह 60 राउंड, एक हातबॉम्ब, 50 राउंडसह 2 अत्याधुनिक पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.

मोहम्मद असरफ उर्फ ​​अली असे या दहशतवाद्याचे नाव आहे. रात्री 9.30 वाजता वाजता त्याला अटक केल्याचे बोलले जात अहे. हा आतंकवादी पाकिस्तानचाया नारोवाल येथील रहिवासी आहे. हा पाकिस्तानी दहशतवादी 6 भारतीय पासपोर्टसह लक्ष्मीनगर परिसरात बराच काळ राहत होता. या दहशतवाद्याच्या अटकेनंतर पोलीस आता त्याचे नेटवर्क आणि साथीदारांविषयी माहिती गोळा करत आहेत. सध्या सुरु असलेल्या नवरात्राच्या काळात काहीतरी मोठा हल्ला करण्याची याची योजना असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डीसीपी पीएस कुशवाहा यांच्या मते, दिल्लीत दहशतवादी हल्ल्याबाबत हाय अलर्ट आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांना अशा प्रकारचे इनपुट मिळाले होते की राजधानीत दहशतवादी हल्ला होऊ शकतो, यासंदर्भात, दिल्ली पोलीस आयुक्तांनी सर्व जिल्हा पोलीस, विशेष सेल आणि गुन्हे शाखा यांना अलर्ट केले होते. आता एका गुप्त माहितीवरून या संशयित दहशतवाद्याला पकडले आहे. (हेही वाचा: Aryan Khan वरील केंद्राच्या कार्यवाहीवर भडकल्या महबूबा मुफ्ती, आडनावावरुन शिक्षा दिली जात असल्याचे म्हणत विचारला प्रश्न)

अटक केलेल्या मोहम्मद अशरफला यूएपीए कायदा, स्फोटक कायदा, शस्त्र कायदा इत्यादी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलीस पथक त्याची चौकशी करत आहे आणि भारतात त्याला कोण मदत करत होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. नेपाळमार्गे तो कोणत्या मार्गाने भारतात पोहोचला आणि या संपूर्ण षडयंत्रात त्याचे सहाय्यक कोण आहेत, याची माहितीही घेतली जात आहे.