
पहलगाम (Pahalgam) मधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरूद्ध कडक पावलं उचलताना 5 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना तातडीने भारत देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या सीमा हैदरचं (Seema Haider) काय होणार? हा प्रश्न देखील आता पुन्हा विचारला जात आहे. सीमा हैदर ही भारतीय तरूण सचिनच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी संसार करण्यासाठी नेपाळ मार्गे विना व्हिसा, पासपोर्ट भारतामध्ये आली आहे.
भारताने अटारी बॉर्डर बंद केली. पाकिस्तानी राजदूतांना हाकलून लावले आणि दशकांपूर्वीचा सिंधू पाणी करार रद्द केला आहे. हा करार 1960 पासून दोन्ही देशांमधील पाणीवाटप नियंत्रित करणारा एक महत्त्वाचा करार होता. याव्यतिरिक्त, दिल्लीने पाकिस्तानी नागरिकांना पूर्वी उपलब्ध असलेली व्हिसा सूट योजना रद्द केली आहे. India Strikes Back: सिंधू पाणी करार स्थगित, अटारी वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी; Pahalgam Terror Attack नंतर भारताचे 5 महत्त्वाचे निर्णय .
बेकायदेशीर प्रवेशासाठी सचिन-सीमा या जोडप्याला अटक करण्यात आली होती, परंतु नंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यांनी एकमेकांशी विवाहित असल्याचा दावा केला.भारत सरकारने अलिकडेच 'वैध' व्हिसा नसलेल्या पाकिस्तानी नागरिकांना दोन दिवसांत देशाबाहेर पडावे असा निर्णय घेतल्याने, सीमा हैदरच्या बाहेर पडण्याच्या अटकळांना महत्त्व आले आहे.
सीमा हैदर चं काय होणार?
केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारतातून निघून जाणे आवश्यक आहे, याचा अर्थ सीमा हैदरलाही पाकिस्तानात परतावे लागू शकते. पण सीमाचं प्रकरण गुंतागुंतीचं असून सध्या न्यायप्रविष्ट आहे. ज्यावर विशेष विचार करणे आवश्यक आहे, असे न्यूज18 ने दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील अबू बकर सब्बक यांच्या हवाल्याने म्हटले आहे. Seema Haider-Sachin Meena welcome Baby Girl: पाकिस्तान मधून अवैध रित्या भारतात आलेल्या सीमा हैदरने दिला सचिन मीना च्या मुलीला जन्म .
सब्बक यांच्या मते, सीमा हैदरच्या प्रकरणातील अंतिम निर्णय उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेल्या भूमिकेवर अवलंबून असू शकतो. सीमा हैदरचे लग्न एका भारतीय नागरिकाशी झाले आहे आणि त्याच्यापासून एक मूल आहे, त्यामुळे तिच्याविरुद्ध कोणतीही कारवाई राज्य अधिकाऱ्यांच्या नकारात्मक अहवालावर अवलंबून असण्याची शक्यता आहे. वैध व्हिसाद्वारे भारतात प्रवेश करणाऱ्या बहुतेक पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे, सीमाने नेपाळमार्गे प्रवेश केल्याने इमिग्रेशन मार्गांना बायपास केले, ज्यामुळे तिचा खटला कायदेशीररित्या गुंतागुंतीचा झाला. तिला भारतीय नागरिकत्व देण्यात आलेले नाही.सध्या तिला देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल कायदेशीर तपासणीला सामोरे जावे लागत आहे.