
कोरोना व्हायरस महामारीने जगभरातील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का पोहोचवला. याला सोने बाजारसुद्धा (Gold Market) अपवाद राहिला नाही. दरम्यान, कोरोना स्थिती असूनही सोने बाजार तेजीत राहिल्याचेही मधल्या काळात पाहायला मिळाले. कोरोनातून स्थिती सावरत असल्याचे चित्र जगभरात निर्माण होताच सोने बाजार पुन्हा घसरला. आता कोरोनाचा नवा ओमिक्रॉन (Omicron) व्हेरीएंट आला आहे. त्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. अशात सोने बाजार (Gold, Silver Prices) मात्र पुन्हा एकदा वधारताना दिसतो आहे. आज सकाळी बुलियन मार्केटमध्ये सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 48,000 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी बाजारात 125 रुपये तेजीसह 0.2% टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. या तेजीसह चांदी प्रति किलो 61,641 रुपये स्तरावर पोहोचली. जाणून घ्या मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई शहरांतील सोने, चांदी दर Gold Price Today).
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने, चांदी चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. Goldprice.org ने दिलेल्या माहितीनुसार, सोने 0/1% तेजीसह आणि मेटल 4,313.98 रुपये प्रति औंस स्तरावर होता. तर सिल्वर फ्यूचर 0.31% तेजीसह 54,426.11 रुपयांवर पाहायला मिळाले. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन लिमिटेड म्हणजे IBJA चे दर पाहता शेवटची अपडेट आली तेव्हा सोने दर जीएसटी न लावता प्रति ग्रॅम 47,544 रुपये 999 (प्योरिटी) इतकी पाहायलाल मिळाली. (हेही वाचा, Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण)
देातील प्रमुख शहरांती सोने दर (प्रति 10 ग्रॅम)
दिल्ली-
22 कॅरेट- 46,920 रुपये
24 कॅरेट -51,180- रुपये
मुंबई-
22 कॅरेट - 46,520- रुपये
24 कॅरेट - 47,520- रुपये
कोलकाता-
22 कॅरेट 46,870- रुपये
24 कॅरेट 49,570- रुपये
चेन्नई-
22 कॅरेट - 45,080- रुपये
24 कॅरेट 49,180- रुपये
चांदीबाबत बोलायचे तर एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चांदी प्रति किलो 61,700 रुपए आहे. दिल्ली शहरात चांदी प्रति किलो 61,700 रुपये पाहायला मिळत आहे. तर मुंबई आणि कोलकाता शहरातही चांदी दर दिल्लीप्रमाणेच आहेत. चेन्नईमध्ये मात्र चांदी प्रति किलो 65,600 रुपये आहे.